AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan 7: “तो माझ्यासाठी मित्रापेक्षाही अधिक..”; अखेर कियाराने दिली सिद्धार्थच्या प्रेमाची जाहीर कबुली

सातव्या सिझनच्या आठव्या एपिसोडमध्ये आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खुलासा करणार आहे. ही अभिनेत्री आहे कियारा अडवाणी (Kiara Advani). अभिनेता शाहिद कपूरसोबत ती कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावणार आहे.

Koffee With Karan 7: तो माझ्यासाठी मित्रापेक्षाही अधिक..; अखेर कियाराने दिली सिद्धार्थच्या प्रेमाची जाहीर कबुली
Kiara Advani and Sidharth MalhotraImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 1:28 PM
Share

कॉफी विथ करण (Koffee With Karan 7) या चॅट शोमध्ये हजेरी लावणारे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देताना दिसतात. सातव्या सिझनच्या आठव्या एपिसोडमध्ये आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खुलासा करणार आहे. ही अभिनेत्री आहे कियारा अडवाणी (Kiara Advani). अभिनेता शाहिद कपूरसोबत ती कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावणार आहे. याआधीच्या एपिसोडमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) कियाराशी असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सूत्रसंचालक करण जोहर साहजिकच कियाराला त्याच्याविषयी प्रश्न विचारणार होता. आता कियारा सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल काय बोलणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या एपिसोडमध्ये ती प्रेम, कुटुंब, लग्न आणि बॉलिवूडबद्दल बऱ्याच गप्पा मारताना दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांवर करण बोलत असतानाच कियाराने जाहीरपणे कबुल केलं की सिद्धार्थ तिच्यासाठी जिवलग मित्रापेक्षाही अधिक आहे. जेव्हा करण तिला लग्नाचा प्रश्न विचारतो, तेव्हा ती म्हणते “माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांचे सुंदर लग्न मी पाहिले आहेत आणि माझ्यासोबतही तेच घडावं अशी माझी इच्छा आहे. पण मी लग्न कधी करणार याचा खुलासा सध्या करू शकत नाही.” कियाराच्या या वक्तव्यावरून शाहिद आणि करणने लग्नाचं वृत्त खरं असल्याचं समजून त्यांच्या लग्नात एकत्र ‘डोला रे डोला’ या गाण्यावर डान्स करणार असल्याचं ठरवतात.

याआधीच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने अभिनेता विकी कौशलसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी करणने सिद्धार्थलाही लग्नाबद्दलचा प्रश्न विचारला होता. करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थनेही कियारासोबत लग्नाचे संकेत दिले. सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या जोडीवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.