Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: शाळेच्या विद्यार्थ्यांकडून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी… मराठी सिनेमाची गगन भरारी…
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' सिनेमा सध्या चाहत्यांच्या भावनांना स्पर्श करत आहेत. सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा सुरु आहे. अशात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमा पाहत असताना एका क्षणात बालपण आणि शाळेचे दिवस समोर येतात. सिनेमात खरंच लहाणपणीची आठवण करुन देत आहे… शाळेची घंटा… शाळेत मिळणारी शिक्षा… मित्रांचा सहवास… शाळेच्या बाहेर असणारी बोरांची टपरी आणि ती लिमलेटची गोळी… या आठवणी सिमेमातून कलाकारांनी ताज्या केल्या आहे… ‘1… 2… 3… 4… क्रांतिज्योतीची पोरं हुश्शार’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांनी सिनेमा पाहताना प्रेक्षकांना हसवलं… पण शेवटी डोळ्यात पाणी देखील आलं… वर्षाची सुरुवात उत्तम करणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा सिद्ध करुन दाखवलं आहे… भारतातील प्रेक्षकांनी तर सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे. पण आता सिनेमा गगन भरारी घेत आहे. म्हणजे सिनेमा आता परदेशात देखील पाहता येणार… हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचा सिनेमा सातासमुद्रा पार पोहोचला… ही मराठी सिनेविश्वासाठी फार मोठी गोष्ट आहे…
View this post on Instagram
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमाची निर्मिती असणाऱ्या ‘चलचित्र मंडळी’ च्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. सिनेमा आता भारतासह दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन येथे प्रदर्शित होणार आहे. ही आनंदाची बातमी शेअर करताना टीमने अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग यांचा व्हिडीओ शेअर करुण देण्यात आली.
व्हिडीओमध्ये क्षिती म्हणजे, ‘नमस्कार आम्ही आहोत क्रांतिज्योती विद्यालयचे विद्यार्थी आणि आम्ही आमचा सिनेमा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ घेऊन येणार आहोत, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये…’, तर पुढे अमेय म्हणतो, ‘भारतात गाजणारा आमचा हा सिनेमा आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन… सगळीकडे खास तुमच्यासाठी.’ व्हिडीओच्या शेवटी कोणाशी याबद्दल संपर्क साधायचा… सिद्धार्थ याने सांगितलं आहे.
सांगायचं झालं तर, रोजच्या तणावातून 2 तास 29 मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढून अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहे. महाराष्ट्रात गाजत असलेला सिनेमा आता भारतात ज्याठिकाणी प्रदर्शित झालेला नाही, त्याठिकाणी देखील प्रदर्शित करण्यासाठी विचारणा केली जात आहे. असं देखील सांगण्यात येत आहे.
