क्रिती सेननचे ब्यूटी सिक्रेट; सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी पिते हे पेय, त्वचा होते चमकदार
क्रिती सेननं तिचे ब्यूटी सिक्रेट आणि स्किन केअर टीप्स चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. एवढंच नाही तर ती सकाळी उठल्या उठल्या एक पेय पिते ज्यामुळे तिची त्वचा चमकदार होते.तसेच हायड्रेट राहते.

आपलं सौंदर्य वाढवायला कोणाला आवडत नाही. अनेकजण घरगुती उपायांसह अभिनेत्री काय स्किन केअर करतात हे देखील फॉलो करतात. अनेक अभिनेत्री त्यांचे ब्यूटी सिक्रेट किंवा स्किन केअर रुटीन आपल्या चाहत्यांसाठी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सेनन. क्रिती अनेकदा तिचं स्किन केअर रुटीन शेअर करत असते. तिने त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहण्यासाठी काय करायचं हे सांगितंलं आहे.
क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट क्रिती सेनन सकाळी उठल्यानंतर पहिलं काम करते ते म्हणजे त्वचेची काळजी घेणे. झोपेतून उठल्यानंतर, क्रिती सामान्य पाण्याने चेहरा धुते आणि सकाळी उठताच त्वचेला चमकदार बनवण्यासाठी क्रिती अनेक टीप्स फॉलो करते.
त्वचेच्या हायड्रेशनसाठी भरपूर पाणी प्या सकाळी उठल्यानंतर क्रिती एक पेय पिते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. क्रिती कोमट पाण्यात लिंबू मिसळून पिते. यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळते आणि त्वचा चमकदार होते.
सौम्य क्लींजरने चेहरा स्वच्छ करणे त्यानंतर क्रिती तिचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य क्लींजर वापरते. यामुळे त्वचेत लपलेली घाण निघून जाते आणि त्वचा चमकू लागते. पिण्याच्या पाण्यासोबतच, क्रिती तिच्या त्वचेवर वाटर स्प्रे करते त्वचेला अतिरिक्त हायड्रेशन मिळेल.
View this post on Instagram
जेल आधारित सीरमचा वापर त्वचेच्या काळजीसाठी, क्रिती जेल आधारित सीरम वापरते. ज्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड असते, ज्यामुळे त्वचा मऊ होते.
सनस्क्रीनचा वापर क्रिती कधीही सनस्क्रीन लावायला विसरत नाही.लाइटवेट वॉटर बेस सनस्क्रीन ती वापरते. त्यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण होते. क्रिती तिच्या चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यासाठी डिटॉक्सिफायिंग मास्क देखील वापरते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे टाळण्यासाठी ती डोळ्यांखालील पॅचेस देखील वापरते.
चेहऱ्यावर बर्फ लावते
चेहरा स्वच्छ केल्यानंतर, मेकअप लावण्यापूर्वी ती तिच्या चेहऱ्यावर बर्फ फिरवते जेणेकरून मेकअप बराच वेळ टिकतो. तसेच चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी, ती तेल-आधारित क्लींजर वापरते जे मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते.
