नवाजुद्दीन सिद्धीकीला ‘कुक्कू’ची साथ

नवाजुद्दीन सिद्धीकीला 'कुक्कू'ची साथ

मुंबई : देशात चालू असलेल्या #MeToo मोहिमेंतर्गत अनेक बॉलीवूड स्टार आणि राजकीय मंडळींवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये आता नवाजुद्दीन सिध्दीकीच्या नावाची भर पडली आहे. मिस इंडिया निहारिका सिंहने #MeTooच्या माध्यमातून नवाजवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अनेकांकडून निहारिकाला सोशल मीडियावरुन पाठिंबा देण्यात आला आहे.

या प्रकरणावर नवाजला पाठिंबा देण्यासाठी सेक्रेड गेम्समधील अभिनेत्री कुब्रा सेठ पुढे आली आहे. तिने या आरोपाचे खंडन करत आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे की, “एका वाईट नात्यासोबत #MeTooला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर एखादे नाते खराब असेल तर ते मीटू नाही. आपल्याला एका बाजूने ऐकून घेण्याआधी दोन्ही बाजूने समजून घेणे महत्त्वाचं आहे. मी नवाजुद्दीन सोबत उभी राहणार आहे”. असं कुबरा सेठने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे.

निहारिका आणि नवाजुद्दीनची ओळख ‘मिस लवली’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान झाली होती. या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली होती. नवाजने आपल्या पुस्तकातंही त्यांच्या नात्याबद्दल लिहिण्यात आलं आहे.

निहारिका सिंहने नवाजुद्दीन सिद्धीकीच्या व्यतिरीक्त टी-सीरीजचे मालिक भूषण कुमार यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवर नवाजकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.

Published On - 1:56 pm, Mon, 12 November 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI