हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला कुमार सानू यांच्याकडून गाण्याची ऑफर?

सोशल मीडियावर सध्या रानू मंडल (Ranu Mandal) यांच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. रानू यांचे पहिले गाणं 'तेरी मेरी कहाणी' प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे.

हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला कुमार सानू यांच्याकडून गाण्याची ऑफर?

मुंबई : सोशल मीडियावर सध्या रानू मंडल (Ranu Mandal) यांच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. रानू यांचे पहिले गाणं ‘तेरी मेरी कहाणी’ प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली आहे. हिमेश रेशमिया (Himesh Reshmiya)  यांच्यासोबत गायलेले गाणं हिट झाल्यानंतर आात गायक कुमार सानूही (Kumar Sanu) रानू मंडल (Ranu Mandal) यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त रानू आणि रानू अशी एकच चर्चा रंगली आहे.

‘तेरी मेरी कहाणी’ गाण्याच्या जबरदस्त यशानंतर हिमेश रेशमियानही रानू मंडल यांच्यासोबत त्याच्या आगामी ‘हार्डी अॅन्ड हीर’ या चित्रपटात ‘आदत’ हे आणखी एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हिमेश आणि रानू मंडल यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तेरी मेरी कहाणी या गाण्याच्या प्रदर्शनाआधीही हिमेशनं मेकिंग व्हिडीओ शेअर केला होता, त्यामुळे प्रदर्शनाआधीच हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. प्रदर्शनानंतर तेरी मेरी कहाणी गाण्यानं काही दिवसातचं 41 दक्षलक्षहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.

रानू मंडल यांचा पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवरील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामान्यांसह बॉलिवूडमधील गायक आणि संगीतकार यांनी रानूचे कौतुक केले.

एकूणच काय रानू मंडल यांच्या मधूर आवाजानं साऱ्यांनाच चांगलीच भूरळ घातली. त्यामुळे येत्या काळात रानू मंडल यांची एकापाठोपाठ एक अनेक गाणी प्रदर्शित झाली तर नवलं वाटायला नको.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *