लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडून कौतुक, सोबत काम करण्याचीही ऑफर; जाणून घ्या ‘या’ गायकाचा किस्सा!

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडून कौतुक, सोबत काम करण्याचीही ऑफर; जाणून घ्या 'या' गायकाचा किस्सा!
datta shinde

महाराष्ट्रात लोकसंगीताची मोठी परंपरा आहे. लोकगीतं, लोकसंगीत महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलं आहे. (lakshmikant-pyarelal offered datta shinde to work with him)

भीमराव गवळी

|

Apr 29, 2021 | 8:33 PM

मुंबई: महाराष्ट्रात लोकसंगीताची मोठी परंपरा आहे. लोकगीतं, लोकसंगीत महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलं आहे. या कलाप्रकाराने राज्याला अनेक रत्न दिली. काही ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत. मात्र, त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. लोकप्रिय गायक दत्ता शिंदे त्यापैकी एक. लोकगीतं असो की आंबेडकरी गीतं… असो की देशभक्तीपर गीतं… प्रत्येक कलाप्रकारात त्यांनी मुक्त मुशाफिरी केली आहे. कोण आहेत दत्ता शिंदे? कसा आहे त्यांचा आजवरचा प्रवास? त्याचा घेतलेला हा धांडोळा. (lakshmikant-pyarelal offered datta shinde to work with him)

बेटा, साथ चलोगे

सुरुवातीच्या काळात कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरच्या फूटपाथवर गायक दत्ता शिंदे आणि विष्णू शिंदे हे दोघेबंधू गाणी म्हणायचे. दत्ता शिंदे तबला वाजवायचे तर विष्णू शिंदे पेटी वाजवून गायचे. त्यावेळी प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडगळीने दत्ता शिंदे यांना तबला वाजवताना पाहिलं. या दोघांनीही दत्ता शिंदे यांच्या तबला वादनाचे तोंडभरून कौतुक केलं. त्यानंतर बेटा, तुम बहोत अच्छा तबला बजाते हो, मेरे साथ चलोगे, अशी ऑफरच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिली. वयाने लहान असलेले दत्ता शिंदे अचानक आलेल्या या ऑफरमुळे गोंधळून गेले. काय सांगावं हेच त्यांना कळेना. दत्ता शिंदे यांनी बोलण्याआधीच त्यांच्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला. तुला हे लोक पळवून नेतील, त्यांच्यासोबत जाऊ नकोस, असं त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं. त्यामुळे दत्ता शिंदे यांनी आलेली ऑफर नाकारली.

उदित नारायणकडून आभार

शिंदे यांचा दुसरा किस्साही असाच आहे. दत्ता शिंदे यांचं नेपोलियन स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं. त्या दिवशी हा स्टुडिओ त्यांच्या नावावर बुक होता. त्याच दिवशी प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना या स्टुडिओमध्ये तासभर रेकॉर्डिंग करायचं होतं. स्टुडिओ मालकाने उदित नारायण यांना शिंदे यांच्याकडे पाठवलं. तेव्हा उदित नारायण यांनी त्यांना रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओ देण्याची विनंती केली. शिंदे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता त्यांना स्टुडिओ दिला. रेकॉर्डिंग झाल्यानंतर उदित नारायण पुन्हा शिंदेंना भेटले. त्यांचे आभार मानले आणि शिंदे यांचा मुलगा आनंद शिंदे यांच्या डोक्यावरून हातही फिरवला. तुमच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे केव्हाही उघडे असल्याचे सांगितले. या प्रसंगामुळे शिंदे अधिकच भारावून गेले होते.

गाजलेली गाणी

दागिन्याने कधी ना भरला गळा,
रमाई लावीते ईमाने कुंकुवाचा टिळा…

आणि

न्यारं होतंया बयेला न्यारं होतंया,
वारं येतंया अंगात वारं येतंया…

आणि

शिकलेले लोक हुकले ते गेलेत वाया,
लाजती जयभीम कराया…

आणि

गुण माझ्या बाळाचं लई बाई छानं,
बोल त्याचं बोबडं गोजिरवाणं,
मांडीवरती येऊन बसतो, येतो लाडाला,
तीन वर्षाचा माझा भीवा,
लागला लुटूलटू चालायला… (साभार, आंबेडकरी कलावंत) (lakshmikant-pyarelal offered datta shinde to work with him)

संबंधित बातम्या:

याच्या 17व्या वर्षापासून गीतलेखन, दहा हजारांवर गाणी लिहिली; वाचा, कोण होते हरेंद्र जाधव?

‘तूच सुखकर्ता’ ते ‘माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू…’; वाचा, हरेंद्र जाधवांची हिट गाणी कोणती?, ज्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?

(lakshmikant-pyarelal offered datta shinde to work with him)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें