Subodh Bhave | ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांकडून कौतुक, ‘आयुष्य सार्थकी लागलं’ सुबोध भावेंची प्रतिक्रिया!

‘भारतरत्न’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून सुबोध भावेंचे कौतुक केले आहे.

Subodh Bhave | ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांकडून कौतुक, ‘आयुष्य सार्थकी लागलं’ सुबोध भावेंची प्रतिक्रिया!


मुंबई : अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून एक्झिट घेत असल्याचे जाहीर केले होते. या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र, सुबोध इन्स्टाग्रामवर सक्रीय असून, त्यांनी नुकतीच एक खास गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून सुबोध भावेंचे कौतुक केले आहे. (Lata Mangeshkar praised Subodh Bhave after watching Balgandharv movie)

लता मंगेशकरांनी केले कौतुक

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी नुकताच ‘बालगंधर्व’ हा चित्रपट पाहिला आणि पोस्ट लिहीत या चित्रपटाचे कौतुकदेखील केले आहे. कौतुक करताना लतादीदी लिहतात, ‘मी आज पहिल्यांदाच बालगंधर्व हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट संगीत-नाटकांचे महान कलाकार बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित आहे. मी माझ्या आयुष्यात बालगंधर्व यांना दोन-ते तीन वेळा भेटले आहे. ते नेहमीच माझ्याशी आपुलकीने वागायचे. मला आर्शिवाद द्यायचे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीसाठी मी त्यांना शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात आमंत्रित केले होते. तेव्हा त्यांनी तिथे दोन भजनेही गायली.

हा चित्रपट पाहताना तो संपूर्ण काळ माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. हा चित्रपट खुपच अप्रतिम आहे. बालगंधर्व यांच्या जीवनातील ज्या गोष्टी मला माहित नव्हत्या, त्या या चित्रपटामुळे समजल्या. बालगंधर्व यांच्या भूमिकेतील सुबोध भावेचे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणाऱ्या आनंद भाटे यांच्यासह संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे खुप खुप अभिनंदन!’. या कौतुकासह त्यांनी एक खास फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये बालगंधर्व, लतादीदी, वसंत देसाई, बेगम अख्तर आणि मोगुबाई कुर्डीकर दिसत आहेत. (Lata Mangeshkar praised Subodh Bhave after watching Balgandharv movie)

आयुष्य सार्थकी लागले : सुबोध भावे

लतादीदींची ही पोस्ट शेअर करत सुबोध भावेंनी आनंद व्यक्त केला आहे. ‘साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक, अजून काय हवं? आयुष्य सार्थकी लागलं, लतादीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार’, अशा शब्दांत सुबोधने आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

रवी जाधव दिग्दर्शित आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या अभिनयाने सुपरहिट ठरलेला ‘बालगंधर्व’ हा मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांच्या आठवणींत आहे. नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते–गायक आणि नाट्यनिर्माते होते. ज्या काळात स्त्रियांना अभिनय करण्यास बंदी होती, त्या काळी बालगंधर्व स्त्री पात्र हुबेहूब रंगवत रसिकांची दाद मिळवायचे. याच नटवर्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट 2011मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनेक नामवंत पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवण्यात आले होते.

(Lata Mangeshkar praised Subodh Bhave after watching  Balgandharv movie)

संबंधित बातम्या : 

Subodh Bhave | काळजी घ्या, मस्त रहा, मी माझं ट्विटर अकाऊंट डिलीट करतोय : सुबोध भावे