AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च

150 वेळा एडिट, बनवण्यासाठी लागली होती 2 वर्षे. बाथरुममध्ये रेकॉर्ड केलं होतं गाणं. ज्याला बनवण्यासाठी 65 वर्षांपूर्वी आला होता 1 कोटी खर्च. आजही ते गाणं प्रचंड लोकप्रिय.

150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 01, 2026 | 11:21 AM
Share

Bollywood Movies : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. अशा चित्रपटांमधील काही सीन हे इतके गाजले की त्यांची आजही चर्चा होते. असाच एक चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिस गाजवलं त्यासोबत आजही ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला आणि आजही तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

भव्य सेट्स, दमदार संवाद, अजरामर संगीत आणि जबरदस्त अभिनय यामुळे हा चित्रपट आजही तितकाच प्रेक्षकांना आवडतो. तब्बल 65 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील प्रत्येक गाणे आजही क्लासिक मानले जाते. मात्र, त्यातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे विशेषतः प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवून आहे. मधुबालाच्या सौंदर्याने, लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने आणि नौशाद यांच्या अजरामर संगीताने सजलेले हे गाणे आजही ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात.

भव्य सेट आणि अभूतपूर्व खर्च

हे गाणे मोहन स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या एका भव्य सेटवर चित्रित करण्यात आले होते. हा सेट तब्बल 150 फूट लांब, 80 फूट रुंद आणि 35 फूट उंच होता. विशेष बाब म्हणजे या एका गाण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. त्या काळात या सेटसाठी 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता, जो त्या वेळच्या कोणत्याही हिंदी चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षाही जास्त होता. आजच्या काळात जर या गाण्याचे चित्रीकरण झाले असते तर त्याचा अंदाजे खर्च सुमारे 55 कोटी रुपये झाला असता असे इंडस्ट्रीतील तज्ज्ञ मानतात.

शकील बदायूनी यांनी या गाण्यासाठी अफाट मेहनत घेतली. नौशाद यांनी गाण्याच्या प्रत्येक ओळीवर बारकाईने लक्ष दिले आणि अंतिम स्वरूप देण्याआधी गीतामध्ये अनेकदा बदल करून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गाणे मंजूर होईपर्यंत त्यात सुमारे 150 वेळा एडिटिंग करण्यात आली होती.

या गाण्याला अमर करणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातून या गीताला वेगळीच उंची दिली. विशेष म्हणजे या गाण्यात इको इफेक्ट वापरण्यात आला होता, जो त्या काळात अत्यंत दुर्मिळ मानला जात होता. नौशाद काहीतरी वेगळे करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी लता मंगेशकर यांना थेट बाथरूम स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करण्यास सांगितले, जेणेकरून गाण्याला नैसर्गिक आणि खोल इको इफेक्ट मिळू शकेल.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू