रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत.

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत. मुळात या चित्रपटाचा नावाविषयी अनेक लोकांना कमालीची उत्सुकता आहे. मात्र, याबाबत एस.एस. राजामौलीने अधिकृत कुठलाही खुलासा केलेला नाही. चित्रपटाच्या कहाणीत स्वातंत्र्यपूर्व काळाचा आढावा घेण्यात आला आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील दोन स्वातंत्र्य वीरांची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे त्याचे नाव सिताराम राजुरी आणि कोमराम भीम असे आहे. (Learn more about Rajamouli’s RRR movie)

स्वातंत्र्यासाठी त्यांनी उभारलेला लढा त्याचे मोठ्या मोहिमेत झालेले रुपांतर हे सारे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आपल्या घरापासून दूर राहून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या दोन वीरांची संघर्षकथा त्यातून उलगडली जाणार आहे. भव्य सेट, लक्षवेधी ग्राफिक्स वापरण्यात वापरण्यात आली आहेत.

एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगन, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.

केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी या चित्रपटाला आतापर्यंत 348 कोटीहून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.

दिग्दर्शक एस.एस. राजामौली त्यांच्या आगामी आरआरआर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये रामचरण आणि एनटीआर दिसत होते. रामचरण घोड्यावर बसलेला आहे आणि गाडीवर एनटीआर दिसत होते. हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली होती.राजामौली यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, 13 ऑक्टोबरला अग्नि आणि पाणी एकत्र येणार आहेत.

आरआरआर (RRR) चित्रपटाच्या निर्मात्यांनी 13 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी बोनी कपूर यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘मैदान’ या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. आश्चर्य म्हणजे आरआरआर आणि मैदान या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

‘बाहुबली’चा बाप येतोय, रिलीजच्या आधीच 348 कोटींची कमाई पक्की !

‘बाप लेक’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार, ‘आचार्य’ पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं, RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा

(Learn more about Rajamouli’s RRR movie)

Published On - 11:07 am, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI