AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना… धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांचे नुकतेच निधन झाले. अभिनयासोबतच त्यांनी कौटुंबिक मूल्यांची नेहमीच जपवणूक केली. त्यांच्या उदार व्यक्तिमत्त्वाची प्रचिती म्हणून त्यांनी वडिलोपार्जित जमीन आपल्या पुतण्यांना हस्तांतरित केली. कुटुंबावर आणि आपल्या मुळांवर असलेले त्यांचे निस्सीम प्रेम या कृतीतून पुन्हा एकदा दिसून येते, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने एक महान व्यक्तिमत्व ठरले.

Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना... धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?
धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय !
| Updated on: Nov 27, 2025 | 1:22 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmednra)  यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अतिशय गुप्तपणे, विलेपार्ले येथील स्मशनाभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी एकाहून एक सरस अशा चित्रपटात काम केलं. त्यांचं अभिनयावर, कामावर एवढं प्रेम होतं, की शेवटच्या क्षणापर्यंत ते अभिनयाच्या दुनियेतच व्यस्त होते. ते जेवढं कामावर प्रेम करायचे, तेवढंच प्रेम त्यांचं त्यांच्या कुटुंबावरही होतं. जवळच्या लोकांची तर ते खूपच काळजी घ्यायचे. आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील लोकांसाठी ते काहीही करायला तयार असायचे. ते फक्त त्यांच्या कुटुंबावर नव्हे तर भावा-बहिणींवरही खूप प्रेम करायचे. म्हणूनच त्यांनी त्यांचे काका, भाऊ, पुतणे यांच्यावर जीव ओवाळून टाकला. त्यांच्यासाठी ते असं काही करून गेले की, त्यासाठी लोकं आजही त्यांची आठवण काढतात.

धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय

धर्मेंद्र यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी त्यांची वडिलोपार्जित जमीनही त्यांच्या पुतण्यांना हस्तांतरित केली आहे. आपल्या पूर्वजांचा वारसा नेहमी, नीट जपता यावा यासाठीच त्यांनी हे पाऊलच उचललं आणि त्यांच्या मुलांपैकी कोणाला नव्हे तर त्यांच्या पुतण्यांना ही जमीन दिली. ते फक्त मोठ्या पडद्यावर, चित्रपटातच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही तितकेच मोठे स्टार आहेत, हेच त्यांनी एकप्रकारे सिद्ध केले. धर्मेंद्र हे नेहमीच मोठ्या मनाचा माणूस होते, वेळोवोळी त्यांनी ते दाखवूनही दिल. या चकाचक, झगमगत्या जगात बराच वेळ घालवला असूनही, त्यांनी कधीही त्यांच्या कुटुंबाशी आणि मुळांशी संपर्क तोडला नाही. त्यांचं वडिलोपार्जित गाव, डांगोशी एक विशेष नातं त्यांनी नेहमी जपलं.

ते फक्त त्यांच्या कुटुंबावर नव्हे तर त्यांचे काका, भाऊ, पुतणे यांच्यावरहरी निरतिशय प्रेम करायचे. ते इतके उदार होते की, त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा मोठा भाग त्यांच्या पुतण्यांना देऊन टाकला. रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे, “ही जमीन आमच्या पूर्वजांकडून मिळालेली एक ट्रस्ट आहे आणि आपण तिची काळजी घेतली पाहिजे.” वडिलांचं हे बोलणं त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं, आणि त्याप्रमाणेच ते वागले.

सर्वजण रहायचे एकत्र

त्यांचं घर म्हणजे केवळ वास्तू नव्हे तर तो पूर्वजांचा वारसा आहे. धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि अगदी नवीन पिढी – सर्वजण एकाच बंगल्यात एकत्र रहायचे, ज्यामुळे त्यांची कौटुंबिक ओळख आणखी मजबूत झाली. धर्मेंद्र यांना घरी बनवलेले जेवण खूप आवडायचे. त्याची मावशी प्रीतम कौर देखील गावात रहायची. कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यानुसार, मुंबईत आल्यानंतरही धर्मेंद्र त्या गोष्टी कधीच विसरले नाहीत. गावाशी जोडलेली नाळ कायम होती. त्यांचे नातेवाईक जेव्हा जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा ते धर्मेंद्रसाठी घरी बनवलेले खवा, बर्फी आणि अनेक पदार्थ आणायचे. धर्मेंद्र ते पदार्थ खूप आवडीने खात असत. 2013 मध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या गावाला भेट दिली, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.