AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liger: ‘लायगर’च्या कमाईचे आकडे पाहून निर्मातेही चक्रावले; बॉलिवूडचा घेतला धसका!

एकीकडे साऊथचे चित्रपट हिट होत असताना दुसरीकडे बॉलिवूडमध्ये एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. याविषयी लायगरची निर्माती चार्मी कौर (Charmme Kaur) हिने चिंता व्यक्त केली आहे. 'लायगर'चं ज्याप्रकारे प्रमोशन करण्यात आलं होतं, ते पाहून हा चित्रपट दणक्यात कमाई करेल असा विश्वास निर्माते-दिग्दर्शकांना होता.

Liger: 'लायगर'च्या कमाईचे आकडे पाहून निर्मातेही चक्रावले; बॉलिवूडचा घेतला धसका!
Liger Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 3:04 PM
Share

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे यांच्या ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 33.12 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टारची मुख्य भूमिका असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विशेष कामगिरी करू शकला नाही. एकीकडे साऊथचे चित्रपट हिट होत असताना दुसरीकडे बॉलिवूडमध्ये एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. याविषयी लायगरची निर्माती चार्मी कौर (Charmme Kaur) हिने चिंता व्यक्त केली आहे. ‘लायगर’चं ज्याप्रकारे प्रमोशन करण्यात आलं होतं, ते पाहून हा चित्रपट दणक्यात कमाई करेल असा विश्वास निर्माते-दिग्दर्शकांना होता. देशातील 17 विविध शहरांमध्ये विजय आणि अनन्याने जोरदार प्रमोशन केलं होतं. विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. मात्र थिएटरमध्ये गर्दी खेचण्यात हा चित्रपट अपयशी ठरला. ही परिस्थिती फारच नैराश्यजनक असल्याचं चार्मीने म्हटलंय.

‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत चार्मी म्हणाली, “ओटीटीमुळे प्रेक्षकांना घरी बसून एका क्लिकवर उत्तम कंटेट पाहण्याची संधी मिळत आहेत. एखादा बिग बजेट चित्रपट संपूर्ण कुटुंब घरी बसून टीव्हीवर पाहू शकतो. जोपर्यंत तुमच्या चित्रपटात प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्याचा दम नसेल, तोपर्यंत ते पैसे खर्च करून थिएटरमध्ये येणार नाहीत. बॉलिवूडबाबत ही परिस्थिती फारच वेगळी आहे. ऑगस्टमध्ये बिंबिसारा, सीता रामम आणि कार्तिकेय 2 हे तीन दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांनी दमदार कमाई केली. एकाच देशात घडणारी ही दोन वेगळी चित्रं पहायला मिळत आहेत. त्यामुळे यामागचं कारण समजणं खूपच कठीण आहे. दक्षिणेतले प्रेक्षक चित्रपटांसाठी क्रेझी आहे, अशी गोष्ट नाही. पण ही संपूर्ण परिस्थिती खूपच भयावह आणि नैराश्यजनक आहे.”

लायगर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला इतका वेळ का लागला, याविषयीही चार्मीने सांगितलं. “जानेवारी 2020 मध्ये लायगरच्या फर्स्ट शेड्युलचं शूटिंग सुरू झालं. 2019 मध्ये आम्ही करण जोहरला भेटलो होतो आणि चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी 2022 उजाडला. लायगर हा थिएटरमध्येच प्रदर्शित केला जावा असा आमचा अट्टहास होता, म्हणूनच आम्ही तीन वर्षे वाट पाहिली”, असं चार्मी म्हणाली. पुरी जग्गनाथ दिग्दर्शित लायगरची निर्मिती पुरी आणि चार्मी कौर यांनी केली. तर करण जोहर या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली करणने लायगरच्या हिंदी चित्रपटाचं प्रमोशन केलं.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.