Video: माधुरी दीक्षितला पाहून अचानक चाहते स्टेजवर आले, खांद्यावर हात ठेवला अन्…
Viral Video: अभिनेत्री माधुरी दीक्षितचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन चाहत्या अचानक स्टेजवर आल्या आणि माधुरीच्या अगदी जवळ उभ्या राहिल्याचे दिसत आहे. ते पाहून माधुरीला देखील धक्का बसला...

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. एकेकाळी माधुरीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले होते. आज माधुरीचे लाखो चाहते आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षितचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन चाहत्या अचानक स्टेजवर जाऊन माधुरीच्या शेजारी अगदी जवळ उभ्या राहतात. ते पाहून माधुरी चकीत होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
८ मार्च रोजी महिला दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अशाच एका कार्यक्रमाला माधुरी दीक्षितने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला माधुरीने सोनेरी रंगाचा वेर्स्टन ड्रेस परिधान केला आहे. तसेच त्यावर ग्लॅमरस मेकअप केला आहे. या लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत आहे. चाहते माधुरीच्या या लूकवर फिदा झाले आहेत.
View this post on Instagram
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित ही मंचावर उभी असते. ते फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देताना दिसते. तेवढ्यात गर्दीमधून दोन महिला चाहत्या मंचावर चढतात. त्या माधुरीच्या दोन्ही बाजूने उभ्या राहतात आणि तिच्यासोबत फोटो काढतात. ते पाहून माधुरीला देखील धक्का बसला. एक चाहती माधुरीच्या खांद्यावर देखील हात ठेवते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसतात. एका यूजरने, ‘घाबरण्यासारखे काय आहे त्यात. चाहते तर आहेत’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत, ‘फॅन रॉक माधुरी मॅम शॉक’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘असे अजिबात वाटत नाही की माधुरी शॉक झाली आहे.’
