“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा अभिनय, सौंदर्य आणि डान्सचे सर्वजण नेहमीच चाहते राहिले आहेत. माधुरीने पावसाचा आनंद घेत रेन डान्स केला आहे. माधुरीने तिच्या 'हम आपके है कौन' 'यै मौसम का जादू है मितवा...' या गाण्यावर हे रील बनवलं आहे. ज्याला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे.

Madhuri Dixit rain dance Image Credit source: instagram
आपल्या अभिनय आणि सौंदर्याने आजही चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. 90चं दशक गाजवलेली माधुरी आजही चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. माधुरी आणि तिचे पती डॉक्टर नेने दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. डॉक्टर नेने आपल्या चाहत्यांना आरोग्याबाबत काहीना काही सल्ले देत असतात. तर माधुरी अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओही बनवताना दिसते. माधुरीने असाच एक रिल बनवला आहे जो सध्या चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.
“यै मौसम का जादू है मितवा…”
सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. या वातावरणात माधुरी देखील स्वत:ला रेन डान्स करण्यापासून रोखू शकली नाहीये. माधुरीने ‘हम आपके है कौन’ सिनेमातील “यै मौसम का जादू है मितवा…” या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. छत्री घेऊन पावसात माधुरीने रील बनवला आहे. या व्हिडिओत तिने पावसामुळे बहरलेल्या निसर्गाचा आनंद घेत चाहत्यांना देखील या सुंदर निसर्गाचे दर्शन घडवले आहे. माधुरीने तिच्या या एव्हरग्रीन गाण्यावर रील बनवल्याने चाहते खूश झाले आहेत. त्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
माधुरीचा रेन डान्स
माधुरीने तिच्या इंस्टाग्रामवर पावसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री छत्री घेऊन पावसात रेन डान्स करताना दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा को-अर्ड सेट घातला आहे. माधुरीने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, ‘वातावरणाची जादू तुमची जादू बनू द्या…’ व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनीही अभिनेत्रीचे खूप कौतुक केले.
‘हम आपके है कौन’ हा माधुरी दीक्षितचा गाजलेला सिनेमा
‘हम आपके है कौन’ हा माधुरी दीक्षितचा सिनेमा गाजला होता. या सिनेमात माधुरी दीक्षित, सलमान खान, रेणुका शहाणे, अनुपम खेर, आलोक नाथ, रीमा लागू अशी स्टारकास्ट होती. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. सूरज बडजात्या यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 1994 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. आणि या चित्रपटातील गाणी सुद्धा आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
