महामानवाच्या दिव्य, तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली एक ऐतिहासिक गोष्ट; पहा ‘महापरिनिर्वाण’चा फर्स्ट लूक

महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली एक ऐतिहासिक गोष्ट, असं म्हणत अभिनेता प्रसाद ओकने 'महापरिनिर्वाण' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. महापरिनिर्वाणदिनी या खास चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महामानवाच्या दिव्य, तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली एक ऐतिहासिक गोष्ट; पहा 'महापरिनिर्वाण'चा फर्स्ट लूक
MahaParinirvaan movieImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 12:48 PM

मुंबई : 6 डिसेंबर 2023 | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचं होतं. त्यांच्या निधनाने लाखो लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे. “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय” असं त्यात ऐकायला मिळतंय. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे.

प्रसाद ओकसोबत अभिनेता गौरव मोरेही या व्हिडीओत दिसत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेले, दलितांच्या हक्कांसाठी लढलेले, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे दूरदर्शी नेते आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखो लोकांनी शोक व्यक्त केला होता. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केलं आहे. संगीतकार विजय गावंडे असून गुरु ठाकूर यांचं या चित्रपटाला गीत लाभले आहे. अमर कांबळे यांनी ‘महापरिनिर्वाण’चे छायाचित्रीकरण केले आहे. तसेच या चित्रपटाचे वेशभूषाकार चंद्रकांत सोनावणे आणि कलादिग्दर्शक नितेश नांदगांवकर आहेत.

अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.