AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महावतार नरसिम्हा’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाला तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी मुस्लीम प्रेक्षकसुद्धा थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

'महावतार नरसिम्हा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर
महावतार नरसिम्हाचे दिग्दर्शक अश्विन कुमारImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2025 | 11:36 AM
Share

प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांनंतरही ‘महावतार नरसिम्हा’ हा ॲनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे. भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली असून काही ठिकाणी तर थिएटरचं अक्षरश: मंदिरात रुपांतर झालं आहे. आपला निस्सिम भक्त प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी आणि असूर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णू नरसिम्हाचा अवतार घेतात. अनेक बंधनं बाजूला सारून विविध धर्माचे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही मुस्लीम प्रेक्षकसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून त्यांनाही ‘महावतार नरसिम्हा’ प्रचंड आवडत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘केजीएफ’, ‘कांतारा’, ‘सलार’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या ‘होम्बाले फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. याच प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरअंतर्गत ‘महावतार नरसिम्हा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विन कुमार म्हणाले, “हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक एकदा नाही तर दोनदा, तीनदा थिएटरमध्ये पोहोचत आहेत. यामध्ये अनेक मुस्लीम प्रेक्षकांचाही समावेश आहे. विविध समुदायाच्या लोकांना हा चित्रपट आवडतोय. या चित्रपटाने त्यांच्या विश्वासाला अधिक मजबूत केल्याची भावना या लोकांनी माझ्यासमोर व्यक्त केली आहे.”

“तुम्ही तुमचा धर्म बदला, असं मी म्हणत नाहीये. मला इतकंच सांगायचं आहे की आस्था काय असते, हे तुम्ही समजून घ्या. मग तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल किंवा सकारात्मक ऊर्जेवर किंवा ब्रह्मांडावर. त्या आस्थेसमोर तुम्ही स्वत:ला समर्पित करा, हेच या चित्रपटातून शिकायला मिळतं”, असं त्यांनी सांगितलं. बॉक्स ऑफिसवर एकीकडे ‘सैयारा’ची त्सुनामी सुरू असतानाच ‘महावतार नरसिम्हा’च्या कलेक्शनने सर्वांनाच चकीत केलं. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने 27 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रक्षाबंधनच्या सुट्टीचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत कमाईचा आकडा 50 कोटींपर्यंत पोहोचू शकतो. या चित्रपटाने गेल्या 16 दिवसांत 145 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘महावतार नरसिम्हा’ हा होम्बाले फिल्म्सच्या फ्रँचाइजीमधील पहिला चित्रपट आहे. यानंतर 2027 मध्ये ‘महावतार परशुराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा आणखी चार ते पाच चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.