Kamal R Khan: ‘मैं अपना बदला लेने के लिए वापिस आ गया हूं’ जामिनानंतर KRK ट्विटरवर पुन्हा सक्रिय

30 ऑगस्ट रोजी केआरकेला मुंबई पोलिसांनी 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटवरून अटक केली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर केआरके पुन्हा आपल्या स्टाईलमध्ये परतला आहे. केआरकेने ट्विट करून विरोधकांसाठी एक घोषणाही केली आहे, 'मी माझा बदला घेण्यासाठी परत आलो आहे', असे केआरकेने लिहिले आहे.

Kamal R Khan: 'मैं अपना बदला लेने के लिए वापिस आ गया हूं' जामिनानंतर KRK  ट्विटरवर पुन्हा सक्रिय
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 3:18 PM

अभिनेता व स्वतःला स्वयं घोषित समीकक्ष समजणारा कमाल आर खान (Kamal R Khan) नुकताच तुरुंगातून परतल्यानंतर ट्विटरवर परतला आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेला त्याच्या जुन्या ट्विटच्या संदर्भात मुंबई विमानतळावरून पोलिसांनी (Police)अटक केली होती. त्यानंतर नुकताच त्याला जामीन मिळाला आहे. सोशल मीडिया सेन्सेशन (Social media) बनलेल्या केआरकेने या जामीनानंतर मीडियावरही धमाकेदार पुनरागमन केले. अटक झाल्यानंतर केआरकेने पहिल्यांदाच ट्विट केले आहे. मी माझ्या अटकेचा बदला घेण्यासाठी परत आलो आहे’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या कारणासाठी केली होती अटक

30 ऑगस्ट रोजी केआरकेला मुंबई पोलिसांनी 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटवरून अटक केली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर केआरके पुन्हा आपल्या स्टाईलमध्ये परतला आहे. केआरकेने ट्विट करून विरोधकांसाठी एक घोषणाही केली आहे, ‘मी माझा बदला घेण्यासाठी परत आलो आहे’, असे केआरकेने लिहिले आहे. केआरकेच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांच्या कमेंट्स सुरू आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘ब्रह्मास्त्राच्या रिव्ह्यूची वाट पाहत आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘पूर्ण स्वागत’.असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

विनयभंगाच्या प्रकरणात अटक

KRK ला दोन वेगळ्या ट्विटसाठी अटक करण्यात आली होती, 2020 मध्ये अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल कथित अपमानास्पद ट्विट केल्याचे प्रकरण . तसेच 2021मध्ये वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंगाच्या प्रकरणात, केआरकेने अशोक सरोगी आणि जय यादव या वकीलांमार्फत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात, एफआयआरमधील माहिती विनयभंगाच्या घटनेशी व्यवहारिकपणे जुळत नसल्याचा दावा केला होता. घटनेच्या18  महिन्यांनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि तोही पीडितेच्या मित्राने तसेच करण्यास सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची वस्तुस्थिती वकील यादव यांनी न्यायालयासमोर मांडली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 27  वर्षीय तक्रारदार 2017 मध्ये मुंबईत आली होती. तिने पोलिसांना सांगितले की ती एक अभिनेत्री, गायिका आणि फिटनेस मॉडेल आहे. तिने सांगितले की, 2017 मध्ये घरातील पार्टीदरम्यान तिची केआरकेशी भेट झाली होती. या पार्टीत केआरकेने निर्माता म्हणून स्वतःची ओळख करून दिली. आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांशी फोन नंबरची देवाणघेवाण केली.अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, त्याच वर्षी केआरकेने सांगितले की तो तिला इमरान हाश्मी अभिनीत कॅप्टन नवाब नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका देईल असे सांगितले . त्यानंतर तिला फोनवर अश्लील मेसेज केले असे या महिलेने आरोपात म्हटले होते.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.