Major Movie Teaser : प्रतिक्षा संपली…, ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर रिलीज

VN

|

Updated on: Apr 12, 2021 | 5:41 PM

‘मेजर’ चित्रपटाचं टीझर नुकतंच लाँच करण्यात आलं. (Major Movie Teaser: The wait is over…, ‘Major’ movie teaser released)

Major Movie Teaser : प्रतिक्षा संपली…,  ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर रिलीज

मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद (Mumbai Terrorist Attack) झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan)  यांच्या जीवनावर ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर (Major Teaser) नुकतंच लाँच करण्यात आलं. या चित्रपटात आदिवी शेष मेजर संदीप यांची भूमिका साकारणार आहे. टीझर लॉन्चिंग इव्हेंटबद्दल बोलायचं झालं तर कोरोना परिस्थिती बघता हा सोहळा व्हर्च्युअली पार पडला. शिवाय बॉलिवूड, टॉलीवूड आणि मॉलिवूडमधील दिग्गज कलाकार त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंवरुन हा टीझर रिलीज करणार आहेत. (The wait is over…, ‘Major’ movie teaser released)

कोरोनामुळे लाँचिंग कार्यक्रम रद्द

‘मेजर’ चित्रपटाचा टीझर 12 एप्रिल म्हणजे आज प्रदर्शित करण्यात आला. त्याचबरोबर, आदिवी शेष देखील गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सोशल मीडिया हँडलवरून मेजर चित्रपटाविषयी अनेक पोस्ट शेअर करत आहेत. आज हैदराबादमध्ये हा सोहळ्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलाय. या चित्रपटाचा टीझर 26 मार्च रोजी मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमांतर्गत लाँच होणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

प्रेक्षकांना चित्रपटाविषयी उत्सुकता

प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण ही शूर सैनिकाची अमर कथा आहे ज्यानं देशासाठी दहशतवाद्यांशी लढताना आपला जीव गमावला. त्यांनी भारताच्या संरक्षणासाठी लढा दिला. ‘मेजर’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले जाईल. आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रमुख बनण्यापर्यंत या शूर सैनिकाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून 2 जुलै 2021 रोजी संपूर्ण भारताला बघायला मिळणार.

मराठमोळ्या सई मांजरेकरनं व्यक्त केल्या भावना

मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर या चित्रपटात झळकणार आहे. ‘चित्रपटात काम करायला भरपूर मजा आली आणि नवीन भाषेत काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मी थोडी घाबरलेली होती मात्र संपूर्ण टीमनं सांभाळून घेतलं’

आदिवीनं व्यक्त केल्या त्याच्या भावना

आदिवी त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाला, संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.

संबंधित बातम्या

Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील फॅशन दिवा…, बोल्ड अँड ब्यूटीफूल सईचे सुंदर फोटो

Photo : ‘रंग हे नवेनवे…’, अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा स्मायलिंग अंदाज

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI