AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर, गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत अन्..

Nana Patekar Passes Away : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. गोव्यामध्ये नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये.

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर, गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत अन्..
Nana Patekar
| Updated on: Oct 08, 2026 | 8:24 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोना पॉला येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गोव्यातील दोना पॉला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी पुढे आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता मृत घोषित केले. नाना पाटेकर आज आपल्यात नाही, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये.

अभिनेते नाना पाटेकर यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात वैद्यकीय पथकाने सकाळी 5 वाजून 20 मिनिटाला वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले. मात्र, जोपर्यंत वैद्यकीय पथक तिथे पोहोचू पर्यंत उशीर झाला होता. ज्यावेळी वैद्यकीय पथक तिथे पोहोचले त्यावेली ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते.

त्यांना घटनास्थळीच कार्डियाक मसाज देण्यात आला आणि रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सकाळी पाच वाजून वीस मिनिटाला त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण वैद्यकीय कायदेशीर स्वरूपाचे असल्याने आज शवविच्छेदन करण्यात येईल. मात्र, नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

चार दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली. नाना पाटेकर अशाप्रकारे जगाचा निरोप घेतली, असे कोणालाही वाटले नव्हते. 75 वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. नाना पाटेकर कायमच त्यांच्या बिनधास्त गप्पांसाठी ओळखले जातचे. इतका मोठा स्टार असूनही साधी जीवनशैली हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. मनोरंजन आणि कलाकार क्षेत्रातील सर्वांनाच नाना पाटेकर यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!