मलायकाच्या लेकाचा ‘हा’ व्हिडीओ बघताच लोकांना आली थेट सलमान खानची आठवण, वडील नाही तर काका…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करतंय. यांचे अनेकदा खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

मुंबई : बाॅलिवूडचे स्टारकिड्स हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे या स्टारकिड्सची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान हा चांगलाच चर्चेत आहे. हेच नाही तर वडील अरबाज खान यांच्या लग्नात धमाल करताना अरहान खान हा दिसला. अरहान खान याचे वडील अरबाज खान यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले. अरहान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.
आता नुकताच अरहान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. अरहान खान याचे हे वागणे पाहून लोकांना थेट सलमान खान याचीच आठवण झालीये. या व्हिडीओनंतर लोक हे अरहान खान याचे जोरदार काैतुक करताना देखील दिसत आहेत. लोकांना अरहान खान याचे हे वागणे आवडल्याचे दिसत आहे.
अरहान खान याचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ महिला दिनाचा आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अरहान खान हा रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलींना बिर्यानी वाटताना दिसतोय. यावेळी बिर्यानी वाटत असताना एक लहान मुलगी अरहान खानला विचारते की, हे व्हेज आहे की, नॉनव्हेज? यावर लगेचच अरहान खान हा चेक करताना दिसतोय.
View this post on Instagram
चिमुकलीच्या जेवणाची काळजी घेताना देखील अरहान खान हा दिसतोय. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक हे अरहान खान याचे काैतुक करताना दिसत आहेत. हेच नाही तर अरहान खान याचा हा व्हिडीओ पाहून लोकांना थेट सलमान खान याचीच आठवण झाली. अरहान खान हा सलमान खान याच्यावरच गेल्याचे अनेकांनी म्हटले.
अरहान खान हा विदेशात शिक्षण घेत असून तो लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाज खान हा मुलाचे काैतुक करताना दिसला. सावत्र आई शूरा खान हिच्यासोबत देखील अरहान खान याचे खास रिलेशन हे बघायला मिळते. अरहान खान हा सोशल मीडियावर चांगला सक्रिय असून त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
