“टॉक्सिक लोकांना आयुष्यातून..”; अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाचा कोणाला टोमणा?

अभिनेत्रीने मलायका अरोराने अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती कोणकोणती आव्हानं स्वीकारणार आहे, त्याची यादीच आहे. या यादीतील शेवटच्या पॉईंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

टॉक्सिक लोकांना आयुष्यातून..; अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाचा कोणाला टोमणा?
Arjun Kapoor and Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 2:10 PM

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. वयातील अंतराला न जुमानता हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचं हे नातं आता संपुष्टात आलं आहे. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने सिंगल असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता मलायकाची एक पोस्ट चर्चेत आली आहे. अर्जुनसोबत ब्रेकअप केल्यानंतर मलायका तिच्या लाइफस्टाइलकडे अधिकाधिक लक्ष देत असल्याचं या पोस्टवरून समजतंय. नोव्हेंबर महिन्यात ती कोणकोणत्या गोष्टींवर अधिक भर देणार आहे, याची यादीच मलायकाने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. या यादीतल्या सर्वांत शेवटच्या गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.

याआधी मलायकाने नोव्हेंबर महिना सुरू होताच ”नो’व्हेंबर.. तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना नाही म्हणण्याची वेळ आली आहे,’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. आता तिने नोव्हेंबर महिन्यातील ‘चॅलेंज’ची यादी टाकली आहे. ‘1- मद्यापन नाही, 2- आठ तासांची झोप, 3- मार्गदर्शक निवडणे, 4- प्रत्येक दिवशी व्यायाम करणे, 5- एका दिवसात 10 हजार पावलं चालणे, 6- सकाळी 10 वाजेपर्यंत रोज उपवास करणे, 7- प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाणं टाळणे, 8- रात्री 8 वाजल्यानंतर काहीच न खाणं, 9- टॉक्सिक लोकांना आयुष्यातून काढून टाकणं’, अशा सर्व गोष्टी या यादीत लिहिलेल्या आहेत.

मलायकाची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र दिवाळीत पहिल्यांदाच अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.