मलायका अरोरा हिला पाहताच लोकांना आली थेट उर्फी जावेद हिची आठवण, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल
मलायका अरोरा ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत दिसते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग असून ती चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. सध्या मलायका अरोरा हिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जातंय. एक व्हिडीओ मलायकाचा व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात मलायका दिसतंय. यावेळी मलायका अरोरा हिने शीर बॉडीकॉन ड्रेस घातला. मात्र, लोकांना मलायका अरोरा हिचा हा ड्रेस अजिबात आवडला नाही.
या ड्रेसमुळेच तिला जोरदार ट्रोल केले जातंय. इतकेच नाही तर मलायका अरोरा हिचा हा लूक पाहून अनेकांना उर्फी जावेद हिची आठवण आली. एकाने कमेंट करत थेट म्हटले की, उर्फी जावेद नावालाच बदनाम आहे. दुसऱ्याने लिहिले की, आजकाल बाॅलिवूडमध्ये अंग प्रदर्शन करण्याची नवीन स्टाईल निघालीये.
तिसऱ्याने लिहिले की, मलायका अरोरा ही उर्फी जावेदची प्रोफेसर आहे. अजून एकाने लिहिले की, नेमका हा ड्रेस कशासाठी घातला हेच मला कळत नाहीये. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या ड्रेसमध्ये मलायका अरोरा ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. मलायका अरोरा हिने काळ्या रंगाचा शीर बॉडीकॉन ड्रेस घातलाय.
View this post on Instagram
मलायका अरोरा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी मलायका कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने आपला 49 वा वाढदिवस साजरा केला.
विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने मलायकाच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. बर्थडे पार्टीमध्ये धमाकेदार डान्स करताना देखील अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसले, या व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय.
