प्रसिद्धी, संपत्तीचा त्याग करत ‘या’अभिनेत्रींनी घेतला संन्यास आणि बदललं स्वतःचं नाव… एकीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये
प्रसिद्धी, संपत्तीचा त्याग करत 'या'अभिनेत्रींनी घेतला संन्यास आणि बदललं स्वतःचं नाव... एकीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये... ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतल्यामुळे इतर अभिनेत्रींची देखील रंगलीये चर्चा...

90 च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता महामंडेलश्वर झाली आहे. आता अभिनेत्रीचं नाव आता माई ममता नंदगिरी आहे. अनेक वर्षांपूर्वी ममता साध्वी झाली आहे. ममता हिच्या शिवाय अन्य अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रसिद्धी आणि संपत्ती सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला… आज अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी ऐश्वर्य सोडून आध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
ममता कुलकर्णी
अभिनेत्री ममता कुलकर्णीचा 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. तेव्हा अभिनेत्रीचं मानधन देखील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत अधिक होतं. पण आता अभिनेत्रीने संन्यास स्वीकारला आहे.ममता कुलकर्णीने आता आध्यात्मिक जीवन स्वीकारलं आहे.आता तिचे नाव माई ममता नंदागिरी आहे.
नीता मेहता
अभिनेत्री नीता मेहता यांनी देखील संन्यास स्वीकारला आहे. 70 आणि 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणाऱ्या नीता मेहता त्या काळातील सुंदर अभिनेत्री होत्या. नीता यांनी आपल्या कुटुंबाविरुद्ध चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि नंतर चित्रपट सोडून साध्वी बनल्या. संन्यास स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव देखील बदललं. त्यांचं नाव आता स्वामी नित्यानंद गिरी असं आहे. त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे.
इशिका तनेजा
अभिनेत्री इशिका तनेजा मिस इंडिया 2017 ची विजेती होती आणि मिस वर्ल्ड टुरिझममध्ये बिझनेस वुमन ऑफ द वर्ल्डचा किताबही जिंकला होता. मधुर भांडारकर यामच्या ‘इंदू सरकार’ सिनेमात देखील अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली. पण अभिनेत्रीने झगमगत्या विश्वाला रामराम ठोकत संन्यास स्वीकारला. जबलपूर येथील द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांच्याकडून अभिनेत्रीने गुरुदीक्षा घेतली.
इशिका तनेजाच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अभिनेत्रीची दोन वेळा नोंद झाली आहे . इशिकाने एकदा 60 मिनिटांत 60 मुलींचा मेकअप करून विक्रम केला होता. करियर यशाच्या शिखराव असताना इशिका हिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
