AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर कॉन्सर्टमध्ये प्रायव्हेट पार्टवर कमेंट; प्रसिद्ध गायिकेचं सडेतोड उत्तर

राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका मोनाली ठाकूरसोबत भर कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करण्यात आलं. गर्दीतून एका व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केल्यानंतर स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या मोनालीने गाणं मध्येचं थांबवलं. त्यानंतर तिने संबंधित व्यक्तीला सुनावलं.

भर कॉन्सर्टमध्ये प्रायव्हेट पार्टवर कमेंट; प्रसिद्ध गायिकेचं सडेतोड उत्तर
मोनाली ठाकूरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2024 | 11:56 AM
Share

प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरसोबत लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गैरवर्तणूक झाली. यामुळे संतप्त मोनालीने कॉन्सर्टमध्ये गाणं थांबवत संबंधित व्यक्तीला सुनावलं. भर कॉन्सर्टमध्ये गर्दीतून एका श्रोत्याने मोनालीच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली. ते ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली आणि तिने मध्येच गाणं थांबवलं. शनिवारी 29 जून रोजी भोपाळच्या सेज युनिव्हर्सिटीमध्ये मोनालीच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. तिच्या कॉन्सर्टला तरुणांची फार गर्दी होती. स्टेजवर परफॉर्म करताना मोनाली अचानक थांबली आणि ती तिच्या टीमसोबत काही बोलू लागली. यानंतर तिने संताप व्यक्त केला.

मोनालीने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे इशारा करत सांगितलं की त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली. या घटनेला मोनालीने लैंगिक शोषण म्हणत संबंधित व्यक्तीवर तीव्र संताप व्यक्त केला. “काही लोक लपून कमेंट करत आहेत. ही सेक्शुअल हरॅसमेंट (लैंगिक शोषण) आहे. मी या मुद्द्यावर सर्वांसमोर बोलतेय, जेणेकरून कमेंट करणाऱ्या लोकांना हे लक्षात राहील. अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कमेंट करणं योग्य नाही. तुम्ही खूप तरूण आहात, तुम्ही कोणाशीच असं वागू नये. हे फक्त माझ्यासाठीच नाही, तर इतर कोणासाठीही ठीक नाही. गर्दीचा फायदा घेत लोक कमेंट करून निघून जातात. मला संधी मिळाली म्हणून मी याबद्दल सर्वांसमोर बोलतेय”, असं ती म्हणाली.

मोनालीच्या टीमकडूनही संबंधित व्यक्तीला समज देण्यात आला. त्यानंतर मोनालीने पुन्हा परफॉर्म करण्यास सुरुवात केली. नंतर कमेंट करणाऱ्या व्यक्तीने आपली बाजू मांडत म्हटलं, “मी फक्त मोनालीच्या डान्स मूव्हवर कमेंट केली होती. त्यात काहीच आक्षेपार्ह म्हटलं नव्हतं.” या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींबद्दल अशा पद्धतीने आक्षेपार्ह कमेंट्स केले जातात. मात्र हे अत्यंत चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

मोनाली ठाकूर ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. यामध्ये ‘मोह मोह के धागे’, ‘सवार लूँ’, ‘जरा जरा टच मी’ यांचा समावेश आहे. मोनाली काही गाण्यांच्या शोजमध्ये परीक्षकेच्या भूमिकेत होती.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...