AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manish Malhotra | मनीष मल्होत्रा याने केली अत्यंत मोठी घोषणा, ‘या’ नव्या उद्योगाला सुरूवात, ड्रेस आणि दिग्दर्शननंतर आता थेट

मनीष मल्होत्रा कायमच त्यांच्या ड्रेस डिझाईनमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच मनीष मल्होत्रा यांच्याकडून मुंबईमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन हे करण्यात आले. या कार्यक्रमाला बाॅलिवूडचे मोठे स्टार देखील उपस्थित होते. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

Manish Malhotra | मनीष मल्होत्रा याने केली अत्यंत मोठी घोषणा, 'या' नव्या उद्योगाला सुरूवात, ड्रेस आणि दिग्दर्शननंतर आता थेट
| Updated on: Sep 01, 2023 | 4:57 PM
Share

मुंबई : मनीष मल्होत्रा हे बाॅलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये मनीष मल्होत्राने एका खास शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये मनीष मल्होत्रा (Manish Malhotra ) याने डिझाईन केलेले कपडे घालून बाॅलिवूड स्टार वाॅक करताना दिसले. इतकेच नाही तर मनीष मल्होत्रा याच्या प्रत्येक पार्टीला बाॅलिवूडचे मोठे स्टार हजेरी लावताना कायमच दिसला. मनीष मल्होत्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही देखील बघायला मिळते. मनीष मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

मनीष मल्होत्रा याला आता बाॅलिवूड क्षेत्रामध्ये तब्बल 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने आता मनीष मल्होत्राने एक अत्यंत मोठी घोषणा ही केलीये. मनीष मल्होत्रा अभिनेते आणि अभिनेत्रीचे आउटफिट्स डिझाईन करतात. नुकताच मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टसोबत अत्यंत मोठी घोषणा ही मनीष मल्होत्राकडून करण्यात आलीये.

आता फॅशन डिझायनिंगसोबतच मनीष मल्होत्रा अजून एक काम करणार आहे. मनीष मल्होत्राने आपल्या प्रोडक्शन हाउसची घोषणा केलीये. मनीष मल्होत्राने आपल्या प्रोडक्शन हाउसचे नाव स्टेज 5 असे ठेवले आहे. आता याच प्रोडक्शन हाउसच्या खाली अनेक चित्रपटांची निर्मिती ही केली जाणार आहे. मनीष मल्होत्रा याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

आपल्या प्रोडक्शन हाउसच्या नावाची घोषणा करत मनीष मल्होत्रा याने म्हटले की, मुळात म्हणजे मला लहानपणापासूनच कपडे, रंग, चित्रपट यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे. मला कपडे डिझाइन आणि संगीतात आवड आहे. मी भारतीय चित्रपट उद्योगाचा एक भाग होण्याचा विचार केला. कपड्यांबद्दलच्या आकर्षणामुळे मला कॉस्च्युम डिझायनर बनण्याची आणि अनेक वर्षांनी स्वतःचे लेबल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

चित्रपटात 30 वर्षांनंतर आज मी तुमच्यासाठी STAGE5 PRODUCTION सादर करत आहे. आता मनीष मल्होत्रा याची हो पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण मनीष मल्होत्रा याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला आपल्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता मनीष मल्होत्रा याचे हे प्रोडक्शन हाउस नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?