दिल्ली: अभिनेता मनोज वाजपेयीची आई गीता देवी यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज (गुरुवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाने मनोज वाजपेयीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली.