अमिताभ बच्चन आणि आराध्या यांच्या फोटोवर अनेकांनी साधला निशाणा, फोटो व्हायरल

महानायक अमिताभ बच्चन यांचा नुकताच वाढदिवस झाला. अभिनेत्री ऐश्वर्या राय बिग बींना शुभेच्छा देत सोशल मीडियावर आराध्या हिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला. पण त्या फोटो अनेकांनी निशाणा साधला आहे.

अमिताभ बच्चन आणि आराध्या यांच्या फोटोवर अनेकांनी साधला निशाणा, फोटो व्हायरल
| Updated on: Oct 12, 2025 | 9:52 AM

महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 83 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. आजही चाहत्यांमध्ये बिग बींची क्रेझ कायम आहे… अशात नुकताच बिग बींचा वाढदिवस झाला आणि अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील बिग बींना शुभेच्छा देत सोशल मीडियावर आराध्या हिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला. सध्या ऐश्वर्या हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या हिने आराध्या हिच्यासोबत अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पा – दादाजी… आमचे तुमच्यावर प्रेम आहे आणि देव तुम्हाला नेहमीच आशीर्वाद देवो…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तुझ्या सासरचे कधीच तुला सोशल मीडियावर शुभेच्छा देत नाही, तू का त्यांना कामय शुभेच्छा देत असते..’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या फक्त अभिषेक, आराध्या., अमिताभ बच्चन आणि तिच्या आई – वडिलांना शुभेच्छा देते. जया आणि श्वेता यांना कधीच शुभेच्छा देत नाही…’

तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत आराध्याचा जुना फोटो पोस्ट केल्यामुळे देखील अनेकांनी ऐश्वर्यावर निशाणा साधला आहे. फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या किती लहान दिसत आहे, तिचा नवीन फोटो नाही का?’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘कायम जुना फोटो पोस्ट केला जातो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं घटस्फोट होणार अशा चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. एवढंच नाही तर, ऐश्वर्या तिच्या सासरी नाही तर, माहेरी आईसोबत राहते… अशी देखील चर्चा रंगली. शिवाय अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे स्पॉट झाल्यामुळे देखील त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.. पण काही दिवसांपूर्वी एका लग्न कार्यात ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले आणि घटस्फोटाच्या चर्चांनी पूर्णविराम लागला…