AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…’, CJP च्या आंदोलनानंतर हेमंत ढोमेची चर्चेत

Video : 'एक गांधी मारला तरी हजारो गांधी जन्म घेतात...', सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावर दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे याने केलेली पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेच आहे...

Video : 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही...', CJP च्या आंदोलनानंतर हेमंत ढोमेची चर्चेत
Hemant Dhome
| Updated on: Jul 27, 2026 | 1:03 PM
Share

Video : ‘एक गांधी मारला तरी हजारो गांधी जन्म घेतात…’, असं म्हणत अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने अहिंसेच्या मार्गाने लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कविता सादर केली आहे. सांगायचं झालं तर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आंदोलन पुकारलं होतं. दिल्लीत सुरु झालेल्या या आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावाच लागला. आंदोलना दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी देखील विद्यार्थ्यांचं समर्थन केलं. हेमंत ढोमे याने देखील आंदोलनाला पाठिंबा दिला. आता त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर हेमंत याने एक कविता सादर केली आहे. इन्स्टाग्राम अभिनेत्याने कविता म्हणताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेमंत ढोमे याची कविता…

गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही… १९४८ ला घातलेल्या गोळ्यांन आता ७८ वर्ष पूर्ण होतील! पण, तरीही तो विचार काही केल्या मरत नाही’

‘तो आजही सक्याच्या मार्गाने चालतो आहे अहिंसेच्या वाटेवर जिंकतो आहे एक गांधी मरला तरी हजारो गांधी जन्म घेतात’ कारण त्या गोळ्यांपेक्षा बहुधा सत्याचा श्वास अधिक भेदक होता’

‘इतिहासाच्या पानावर एकत वाक्य कोरलं गेलंय काळाच्या न्यायालयात हिंसेचा पराभव होतोच नावं बदलतात, चेहरे बदलतात, पुन्हा गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात पुन्हा लाठ्या – काठ्या चालवतात’

‘पण गांधी पुन्हा जन्म घेतो एकत्र येतो, लढतो, पुन्हा सत्याला जिंकलतो! आणि ७८ वर्ष उलटून गेली तरी गोळ्या झाडणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…’

हेमंत ढोमे याने सादर केलेली ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत हेमंत याने कॅप्शनमध्ये ‘सत्यमेव जयते!’ असं लिहिलं आहे. तर व्हिडीओच्या शेवटी हेमंत याने महात्मा गांधी यांचा एक फोटो लावला असून त्यावर ‘हा देश गांधीबाबाचा होता… आहे… आणि कायम राहणार!’ असं लिहिलं आहे.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना