AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ कदम, ओंकार राऊत..; मनोज वाजपेयीच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये मराठमोळी फौज; चित्रपटाची का होतेय इतकी चर्चा?

सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपटाची हलकी-फुलकी कथ, ,सत्य घटनेवरील कथा त्यात मराठमोळी कलाकार अन् मनोज वाजपेयी. ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच मिळालेला प्रतिसाद चित्रपट रिलीजनंतरही पाहायला मिळत आहे. सध्या चित्रपटाची आणि त्यातील मराठी कलाकारांची चर्चा होताना दिसत आहे.

भाऊ कदम, ओंकार राऊत..; मनोज वाजपेयीच्या 'इन्स्पेक्टर झेंडे'मध्ये मराठमोळी फौज; चित्रपटाची का होतेय इतकी चर्चा?
Marathi actors were also seen in Manoj Bajpayee Inspector ZendeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2025 | 4:40 PM
Share

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या बहुप्रतिक्षित ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तेव्हाच फार पसंती मिळाली होती आणि लोक चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. आता 5 सप्टेंबरला अखेर हा चित्रपट रिलीज झाला आहे.

चित्रपटात मराठी कलाकारांची फौज 

या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात अनेक मराठी कलाकार आहे. मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. या कलाकारांमध्ये भालचंद्र कदम, सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक, ओकांर राऊत, हरीश दुधाडे,भरत सावले, वैभव मांगले आणि नितीन भजन असे दमदार कलाकार पाहायला मिळतात. या चित्रपटात या सर्वांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मरठी अभिनेता तथा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे.

चित्रपटाची कथा

या चित्रपटात मनोज वाजपेयी एका अत्यंत चलाख आणि हुशार पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणजेच ‘इन्स्पेक्टर झेंडे’ च्या भूमिकेत आहे. तो एका कुख्यात गुन्हेगार ‘कार्ल भोजराज’ याचा पाठलाग करताना दिसतो. कार्ल भोजराज हे नाव कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या नावावरून घेतला आहे. ट्रेलरमध्ये पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील पाठलाग रोमांचक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. तसेच स्टोरीमधील सस्पेन्सही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

अभिनेते भाऊ कदम यांचीही महत्त्वाची भूमिका

चित्रपटात अभिनेते भाऊ कदम यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. भाऊ कदमचा भूमिकेतील साधेपणा आणि सहजता टीकवूनच त्यांनी पोलिसाची भूमिका अगदी चोख पार पाडली आहे. तसेच ओकांर राऊत आणि हरीश दुधाडे देखील पहिल्यांदाच गंभीर पण सोबतच विनोदी पात्रांमध्ये दिसत आहे. तसेच इतर मराठी कलाकार मंडळींनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

‘इन्स्पेक्टर झेंडें’ची भूमिका साकारलेले मनोज वाजपेयी म्हणजे चित्रपटाचा युएसपी 

तर या चित्रपटातील ‘इन्स्पेक्टर झेंडें’ची भूमिका साकारलेल्या मनोज वाजपेयींबद्दल वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारण जिथे मनोज वाजपेयी असतात तिथे धुमाकूळ तर असतोच. ही भूमिका मनोज यांनी फार मनापासून निभावली आहे. तेव्हा ज्यांना या भूमिकेबद्दल, या पात्राबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं. याच कारण सांगताना ते म्हणाले की, “चित्रपटातील ‘इन्स्पेक्टर झेंडे’ ची भूमिका मला खूप आवडली. ते केवळ प्रसिद्धीसाठी काम करत नव्हते, तर आपले कर्तव्य बजावत होते आणि त्याच कर्तव्यादरम्यान त्यांनी एका मोठ्या गुन्हेगाराला दोन वेळा पकडलं. त्याचं शौर्य, विनोदबुद्धी आणि मुंबईचा विशेष बाज मला खूप प्रेरणादायी वाटला. त्यांना भेटणे म्हणजे एका पुस्तकातील पात्राला भेटल्यासारखे होते. ट्रेलर फक्त एक झलक आहे, खरा चित्रपट तुम्हाला त्याच्या कथेच्या आत घेऊन जाईल.”

चित्रपटाची कथा हलकी-फुलकी पण खिळवून ठेवणारी

खरोखरंच चित्रपट हलकाफुलका असून प्रेक्षकांना कुठेही कंटाळवाणा वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हाच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आणि आता चित्रपटालाही तेवढाच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.