Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ ‘राधिका’ मैदानात, म्हणाली, ‘माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!’

अभिनेत्री अनिता दातेने (anita date) अभिनेते किरण माने (kiran mane) यांना आपला पाठिंबा दिला आहे. एका फेसबुक पोस्टनंतर किरण माने यांना 'मुलगी झाली हो' (mulgi zali ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. हा अन्याय आहे, असं अनिता दातेने म्हटलं आहे.

Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ 'राधिका' मैदानात, म्हणाली, 'माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!'
अनिता दाते, किरण माने

मुंबई: अभिनेत्री अनिता दातेने (anita date) अभिनेते किरण माने (kiran mane) यांना आपला पाठिंबा दिला आहे. एका फेसबुक पोस्टनंतर किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ (mulgi zali ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. हा अन्याय आहे, असं अनिता दातेने म्हटलं आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत अनिता दातेने आपलं मत मांडलं आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत किरण माने आणि अनिता दाते यांनी एकत्र काम केलं आहे. अनिता म्हणजे मालिकेतील राधिकाच्या भावाचं पात्र किरण यांनी साकारलं होतं.

अनिता दातेची फेसबुक पोस्ट

अभिनेत्री अनिता दातेने फेसबुकवर पोस्ट लिहून किरण यांना आपला पाठिंबा दिला आहे. एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने यांच्या बाजूने आहे. कोणत्याही अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरुन बाजूला करणे चुकीचे आहे. अशी निर्मिती संस्था आणि चॅनल यांनी त्या कलाकाराला कामावरुन काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अश्या व्यवस्थेचा मी निषेध करते, असं अनिता दातेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

अनिता दाते पुढे म्हणते, ‘व्यवस्था समजून घेणं, व्यवस्थेला प्रश्न विचारणं, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणं, ही खरंतर चांगली गोष्ट आहे. त्याबाबत किरण यांचं कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणं, चुकीचं आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो, चर्चा करु शकतो. मात्र त्याचं तोंड बंद करणं, त्याला धमकावणं, त्याच्या व्यवसायावर-कामावर टाच आणणं हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध आणि मागास असल्याचं लक्षण आहे.’

अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली त्यानंतर त्यांना स्टार प्रवाहवरच्या मुलगी झाली हो या मालिकेतून बाजूला केलं गेलं. यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनिता दातेने किरण माने यांना पाठिंबा देत घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत किरण माने आणि अनिता दाते यांनी एकत्र काम केलं आहे. अनिता म्हणजे मालिकेतील राधिकाच्या भावाचं पात्र किरण यांनी साकारलं होतं.

संबंधित बातम्या

Actor Kiran Mane | साहेबांसमोर खरा माणूसच बसू शकतो…पवार भेटीनंतर काय म्हणतायत अभिनेते माने?

विजय माल्याचा ‘किंगफिशर’ खरेदी करणारा, राज कुंद्राचा पूर्व बिझनेस पार्टनर अभिनेता सचिन जोशी ईडीच्या रडारवर, 410 कोटींची संपत्ती जप्त

बिग बॉस मराठी ३’ चा विजेता विशाल निकमची रिअल लाईफ ‘सौंदर्या’ कोण?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण, विशालने स्वत: केला खुलासा

Published On - 5:56 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI