AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही – मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट चर्चेत

मनोरंजन सृष्टीतील अेक अभिनेत्री त्यांचं मत बऱ्याच विषयांवर स्प्षटपणे मांडतात. कधी मुलाखतीत तर कधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्या महत्वाच्या विषयांवर मोकळेपणाने व्यक्त होता. आता सध्या 'मंगळसूत्र' हा विषय भलताच चर्चेत आहे

मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही - मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट चर्चेत
राधिका देशपांडेची पोस्ट चर्चेत
| Updated on: Apr 23, 2024 | 11:35 AM
Share

मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांचं मत बऱ्याच विषयांवर स्प्षटपणे मांडतात. कधी मुलाखतीत तर कधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्या महत्वाच्या विषयांवर मोकळेपणाने व्यक्त होता. आता सध्या ‘मंगळसूत्र’ हा विषय भलताच चर्चेत आहे. राजकारण असो किंवा मनोरंजनसृष्टी, सगळीकडे मंगळसूत्राचीच चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस सर्वसामान्यांच्या संपत्तीचं सर्वेक्षण करणार आहे, ते सत्ते आले तर तुमचं मंगळसूत्रदेखील हिसकावून घेतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. यावरून सोशल मीडियावरही बराच वाद सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री क्षिती जोगने लग्नानंतर मंगळसूत्र घालावं की नाही यावरून एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. एकंदरच ‘मंगळसूत्राच्या’ मुद्यावर बरेच वाद सुरू आहेत.

आता या वादात मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनेही उडी घेतली असून ती चांगलीच संतापली आहे. सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर करत परखडपणे मत मांडलं आहे.

काय म्हणाली राधिका देशपांडे ?

राधिकाने इन्स्टाग्रावर शेअर केलेली पोस्ट जशीच्या तशी…

मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही.

मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ?

धमकी वजा सूचना समजा

उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे.

घर घ्यायची वेळ आल्यावर..

घर घ्यायची वेळ आली तेंव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला.

लग्नातला फोटो केला शेअर

या पोस्टसोबत राधिकाने तिच्या लग्नातला एक फोटो शेअर केलाय, पण त्यामध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये. त्याबद्दलही तिने स्पष्टीकरण दिलंय –

हा फोटो २००५ सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेंव्हा पासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!