AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझे ओठ आणि हात थरथरत होते…’ संजय दत्तसोबत ‘बेडरूम सीन’ करताना ही मराठी अभिनेत्री घाबरली होती

अभिनेत्रीने एका चित्रपटातील संजय दत्तसोबतच्या 'बेडरूम सीन'चा अनुभव सांगितला. युनिटने 'बेडरूम सीन' म्हटल्यावर ती खूप घाबरली होती आणि तिचे ओठ व हात थरथरत होते. हेअरड्रेसरच्या एका प्रश्नाने तर ती अधिकच गोंधळली. नंतर संजय दत्तने तिला काय समजावले हे देखील तिने सांगतिलं आहे. 

'माझे ओठ आणि हात थरथरत होते...' संजय दत्तसोबत 'बेडरूम सीन' करताना ही मराठी अभिनेत्री घाबरली होती
Sonali Kulkarni was scared while doing a bedroom scene with Sanjay DuttImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2025 | 4:28 PM
Share

अनेकदा चित्रपटाच्या शुटींग दरम्यान असे काही किस्से घडतात कि ते कलाकारांच्या कायम लक्षात राहतात. त्यात जर रोमँटीक किंवा इंटीमेट सीन असेल तर अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातही तो गोंधळ उडतो किंवा असे सीन करताना शक्यतो सेलिब्रिटींना अवडघडल्यासारखं होतं. अशाच एका सीनचा किस्सा घडला होता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत. विधू विनोद चोप्रा यांच्या “मिशन काश्मीर” चित्रपटात संजय दत्त सोबत एक रोमँटीक सीन शूट करतेवेळी नक्की काय झालं होतं याचा मजेदार किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता.

संजय दत्तसोबत “बेडरूम सीन” करायचं म्हटल्यावर अभिनेत्री घाबरली 

या चित्रपटात युनिटने सोनालीला संजय दत्तसोबत “बेडरूम सीन” करायचं असं सांगितलं आणि त्यामुळे ती खूप घाबरली होती. त्यावेळी सोनाली कुलकर्णी या इंडस्ट्रीत तशी नवीन होती. तिच्या हेअरड्रेसरने तिला विचारले की तिने या सीनसाठी वॅक्सिंग केले आहे का. सोनाली म्हणाली की हे ऐकून ती खूप घाबरली होती. हेअरड्रेसरच्या प्रश्नाने ती गोंधळली आणि घाबरली.

हेअरड्रेसरने विचारलं की मी वॅक्सिंग केले आहे का?

हा किस्सा सांगताना सोनाली म्हणाली, “चित्रपटात एक दृश्य होते ज्याला सर्वजण ‘बेडरूम सीन’ म्हणत होते. त्यांना ते म्हणण्याची गरज नव्हती, पण त्यावेळी लोक तेच म्हणत असत. मी माझा ड्रेस बदलल्यानंतर, हेअरड्रेसरने विचारलं की मी वॅक्सिंग केले आहे का? हे ऐकून मला धक्का बसला आणि घाबरले. मी म्हणाले, ‘कदाचित मी केले असेल.’ मी इतकी घाबरले होते की मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. माझे ओठ आणि हात थरथरत होते.”

View this post on Instagram

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

सोनालीने तो सीन नक्की काय होता हे सांगताना म्हटलं या दृश्यात संजय दत्त मला सांगतो की अल्ताफने आज मला ‘अब्बा’ म्हटले आणि यावर सोनाली उत्तर देते की तो मला आधी ‘अम्मी’ म्हणत असे.” या संभाषणादरम्यान, पती-पत्नीची पात्र एकमेकांना मिठी मारतात. तो तिला उचलून घेतो आणि तो सीन संपतो.”

जेव्हा संजय दत्त म्हणाला – मला फक्त मिठी मारायची आहे

सोनाली पुढे म्हणाली, “पण मी याबद्दल इतकी घाबरले होते की मला माझा गाऊन नीट करत होते. मध्येच उठत होते, बसत होते, मी फार अस्वस्थ झाले होते. हे सर्व पाहून संजय दत्तने मला बोलावले. तो म्हणाला की यात किसिंग सीन नाही, फक्त दोन संवाद आणि एक मिठी आहे”

त्यानंतर संजय दत्तने सोनालीला सांगितले, “मी पण घाबरलो आहे, आणि जर तू पण अशी घाबरलीस तर हा सीन होणार नाही, बेटा. तर थोडं रिलॅक्स हो” सोनालीने संजय दत्तबद्दलचा हा किस्सा शेअर केला आणि म्हटले की तो खूपच चांगला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.