AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

का सगळं अंगावर काढलंस? काहीच पत्ता लागू दिला नाही अन् 3 दिवसात… तेजस्विनी पंडितची ती पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचे ऑगस्ट १६ रोजी निधन झाले. ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तेजस्विनीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करून आईला श्रद्धांजली वाहिली. तिने आईच्या कामाबद्दल आणि तिच्या आठवणींबद्दल लिहिले आहे.

का सगळं अंगावर काढलंस? काहीच पत्ता लागू दिला नाही अन् 3 दिवसात... तेजस्विनी पंडितची ती पोस्ट चर्चेत
tejaswini pandit 1
| Updated on: Aug 31, 2025 | 12:26 PM
Share

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित हिच्या आई ज्योती चांदेकर यांचं शनिवारी (16 ऑगस्ट) निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे तेजस्विनी पंडित कोलमडून गेली आहे. तिने तब्बल १६ दिवसांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आईला श्रद्धांजली वाहिली असून तिच्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केली आहे.

तेजस्विनी पंडितने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आईचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. यावेळी तिने मी तुझं पुस्तक पूर्ण करेन असे आश्वासनही दिले.

तेजस्विनी पंडितची पोस्ट

“आई काय बोलू……. अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस. आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण, आपल्या फार्म वर new year celebrate करायचा होता. तुझ्यावरचं पुस्तक प्रकाशन आज तुझ्या वाढदिवसाला करायचं होतं आपल्याला, त्याचं किती काम बाकी राहून गेलं…. आई तू ना प्रचंड हट्टी होतीस . किती वर्ष तुला सांगते होते आधी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला. मला नेहमी म्हणायचीस काम करता करता मरण यावं. कित्येकदा तुला सांगितलं तुझ्या मुली खमक्या आहेत. तू आता फक्त तुझ्या आनंदासाठी काम कर. तुझ्या terms वर. पण कामाप्रती तुझी श्रद्धा काही औरच होती. आणि बरोबरच आहे, कामात स्वतःचा आनंद असणारी,मानणारी माणसं आजच्या पिढीत क्वोचितच सापडतात. खूप निग्रही, निष्ठावंत, मेहनती होतीस तू आई.

खूप धावपळ, खूप काम केलंस. खूप खस्ता खात, कष्ट करत आम्हाला वाढवलंस. कधीच त्या कष्टाची तक्रार केली नाहिस. पण वयानुसार मन मोठं होत असलं तरी शरीर थकतं हेही समजून घायला हवं होतंस ना गं आई! का ग अंगावर काढलंस सगळं? पत्ताच लागू दिला नाहीस काहीच. ३ दिवसात होत्याचं नव्हतं झालं ! माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं आई……… बाबा हाक मारता येत नव्हती आता आई हाक मारली तर ओ द्यायला कुणीच नसेल का गं ???

आई, तू कलाकार म्हणून भन्नाटच होतीस, आहेस आणि राहशील. तुझ्या भारदस्त आवाजाने आणि पाणीदार डोळ्यांनी तू प्रेक्षकांना कायम भारावून टाकायचीस…..कलाकार हा नेहमीच त्याच्या कलाकृतीतून जिवंत राहतो. त्यामुळे तू आहेसच , असशीलच. तुझ्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप कौतुक वाटायचंच, ह्यावेळेला मात्र अभिमानाने ऊर भरून आला. तुझ्यासारख्या कलाकाराच्या पोटी मी जन्माला आले ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय !!

आणि माझी काळजी करू नकोस. तू स्वतः आयटीत जगलीस, त्यामुळे मला जसं वाढवलं आहेस तशीच मी जगेन. रूबाबात. fearless. जिंदादिल. आणि दीदी आणि कथा ची काळजी घेईन. तुझ्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आम्ही दोघी मिळून पूर्ण करू ! तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन आणि तुझा प्रेरणादायी प्रवास त्या पुस्तकरूपी वाचकांसमोर/ प्रेक्षकांसमोर आणेन. आता तरी तू आराम कर. तुझा पुढचा प्रवास ज्योतीर्मय, शांतीने आणि आनंदात होऊदेत. बाबावर करायचं राहिलेलं सगळं प्रेम करून घे. तुम्हाला आता कुणी वेगळं करू शकत नाही. Cheers … बाबाला माझ्याकडून पप्पी दे. आणि दोघेही आमच्यावर लक्ष ठेवा आणि आशीर्वाद देत रहा बस !!”, अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.