AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक सराफ पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार; ‘लाईफ लाईन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Saraf And Madhav Abhyankar New Movie : अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लाईफ लाईन' हा सिनेमा 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची गोष्ट काय आहे? या सिनेमात आणखी कोण कलाकार आहेत? वाचा सविस्तर......

अशोक सराफ पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार; 'लाईफ लाईन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'लाईफ लाईन' सिनेमाImage Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2024 | 2:04 PM
Share

अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचा नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात अशोक सराफ – माधव अभ्यंकर यांच्यात पराकोटीचा संघर्ष रंगणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर दिसत असून अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अशोक सराफ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत उत्सुकता आहे.

कोण-कोण कलाकार सिनेमात दिसणार?

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लाईफ लाईन’ या चित्रपटात हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर यांनी हा दिग्दर्शित केला आहे. तर लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट या चित्रपटाचे निर्माते आहेत.

राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. ‘लाईफ लाईन’ हा चित्रपट 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे.

अतिशय नाजूक विषय असल्यामुळे अतिशय संवेदनशीलरित्या आम्ही तो मांडला आहे. विज्ञान आणि जुन्या परंपरा यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. प्रत्येकाची विचारसरणी बदलणारा ‘लाईफ लाईन’ आहे. कथानक, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असं दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी म्हटलं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.