AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidhutai Sapkal | अभिनेत्री म्हणून मला ‘सिंधूताई सपकाळां’नी ओळख मिळवून दिली! तेजस्विनी पंडितने ‘माईं’ना वाहिली श्रद्धांजली!

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यांवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Sidhutai Sapkal | अभिनेत्री म्हणून मला ‘सिंधूताई सपकाळां’नी ओळख मिळवून दिली! तेजस्विनी पंडितने ‘माईं’ना वाहिली श्रद्धांजली!
Tejaswini Pandit
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 05, 2022 | 10:42 AM
Share

मुंबई :  ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यांवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची देखील शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी (4 जानेवारी) त्यांची प्राणज्योत मालावली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावरही चितारण्यात आला होता.

‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सिंधूताई सपकाळ यांची भूमिका साकारली होती. सिंधूताईच्या निधनाची बातमी कळताच तेजस्विनीच्या पायाखालची जमीन देखील सरकली. माईंविषयी भावनिक पोस्ट लिहित तेजस्विनीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

काय म्हणाली तेजस्विनी?

‘अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं ? पटकन judge करतो ना आपण त्यांच्या social media वरुन माणसाला ? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो ?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या ph वरुन बातमी confirm झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ ph वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती.

माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस !

“अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारीचा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.

लोकहो एक विनंती…. घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death.

तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.

ओम शांती. माई….

– तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई’

पाहा पोस्ट :

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना