AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक खास भेट! आयफोन खरेदीवर 35 हजार रूपयांची सूट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

एअरटेल वापरकर्ते आता आयफोन खरेदीवर 35 हजार रूपयांपर्यंतची बचत करू शकतात. या ऑफरमध्ये इन्स्टंट डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात या खास ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक खास भेट! आयफोन खरेदीवर 35 हजार रूपयांची सूट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Airtel
| Updated on: Aug 17, 2026 | 5:25 PM
Share

स्नेहल मेंगळ : तुम्ही जर एअरटेल वापरकर्ते असाल त्यात तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक विशेष ऑफर आहे. या क्रोमा ऑफरअंतर्गत एअरटेल ग्राहकांना निवडक आयफोन मॉडेल्सवर 23 हजार रूपयांपर्यंतची फ्लॅट डिस्काउंट मिळू शकते. याव्यतिरिक्त जुना फोन एक्सचेंज केल्यावर 12 हजारापर्यंतचा अतिरिक्त बोनसही मिळू शकतो. म्हणजेच ग्राहक 35 हजारांपर्यंत बचत करू शकतात. मात्र हा एक्सचेंज बोनस फक्त क्रोमाच्या ऑफलाइन स्टोअर्समध्येच उपलब्ध आहे. चला तर मग या ऑफरमध्ये कोणत्या आयफोन मॉडेल्सवर सूट ‍दिली जात आहे ते जाणून घेऊयात.

क्रोमाने एअरटेल वापरकर्त्यांसाठी आयफोन खरेदीवर एक विशेष सवलत ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये निवडक आयफोन मॉडेल्सवर ईएमआयचे पर्यायही दिले जात आहेत. ही ऑफर ऑनलाइन खरेदीसाठी आणि क्रोमा स्टोअर्समध्ये, दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. तथापि, या ऑफरमधील लाभ केवळ निवडक आयफोन मॉडेल्सवरच लागू आहेत.

या आयफोन मॉडेल्सवर ऑफर्सचा घेता येईल लाभ

या ऑफरमध्ये आयफोन 15, आयफोन 16, आयफोन एअर, आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. म्हणजेच, ग्राहकांना स्टँडर्ड मॉडेलपासून ते प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सपर्यंत निवडण्याचा पर्याय आहे. याव्यतिरिक्त तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 12 हजारांपर्यंतचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळवता येईल. या बोनसचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त क्रोमाच्या ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे, ऑनलाइन नाही.

एअरटेल थँक्स ॲप वापरून दावा कसा करावा

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम एअरटेल थँक्स ॲप उघडा.

प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर रिवॉर्ड्स सेक्शनमध्ये जा.

तुम्हाला आयफोन ऑफरचा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही ऑफर क्लेम करू शकता.

एकदा क्लेम केल्यावर, डिस्काउंट आणि कूपन कोड क्रोमा वेबसाइटवर किंवा थेट क्रोमा स्टोअरमध्ये वापरता येईल.

ही ऑफर क्लेम करण्याची अंतिम मुदत 5 सप्टेंबर 2026 आहे, त्यामुळे एअरटेल वापरकर्त्यांनी त्यापूर्वीच ती क्लेम करणे आवश्यक आहे.

Follow Us
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव