Bhau Kadam: भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेत; ‘घे डबल’ चित्रपटाची उत्सुकता

येत्या 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास तयार आहे.

Bhau Kadam: भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेत; 'घे डबल' चित्रपटाची उत्सुकता
Bhau Kadam: भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 11:27 AM

मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचं लवकरच आगमन होणार आहे आणि या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार कॉमेडी स्टार भाऊ कदमची (Bhau Kadam) दुहेरी भूमिका. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ (Ghe Double) या चित्रपटाचं भन्नाट टीझर पोस्टर सोशल मीडियावर झळकलं आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास तयार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केलं असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच ‘घे डबल’ हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत आणि मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार.”

हे सुद्धा वाचा

भाऊ कदमचा ‘पांडू’ हा चित्रपटसुद्धा चांगलाच गाजला होता. यामध्ये त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी आणि कुशल बद्रिकेनं भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात पांडू आणि महादू या दोन कोल्हापूरच्या लोककलावंतांची मजेशीर कथा प्रेक्षकांना पहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता. त्यामुळे आता भाऊ कदमचा हा आगामी चित्रपट कसा असेल, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.