AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pavankhind : ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Pavankhind: अतुलनीय शौर्याच्या यशोगाथेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

Pavankhind : 'पावनखिंड'चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
Pavankhind
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:59 PM
Share

शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला (Marathi Movie) जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला गेला आहे. पहिल्याच दिवशी १५३० शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला. तर शनिवारी ४२१ चित्रपटगृहांमध्ये १९१० शोज लागले. एवढया विक्रमी संख्येने ‘पावनखिंड’ची जोरदार घौडदौड सुरु आहे. मराठमोळा पोशाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल-ताशे आणि तुताऱ्यांच्या निनादात ‘पावनखिंड’चे शो पाहिले जात आहेत. आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत पावनखिंड’ या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॅाकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. त्यातच ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या यशस्वी चित्रपटांमुळे ‘पावनखिंड’ चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली होती. पहिल्या दिवशी सिनेप्रेमींनी ‘पावनखिंड’ पाहण्यासाठी केलेली गर्दी हा त्याचाच परिपाक असल्याचं चित्रपट माध्यम आणि व्यवसायतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.