‘भारत माझा देश आहे’ चं पोस्टर रिलीज, 6 मे रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे.

'भारत माझा देश आहे' चं पोस्टर रिलीज, 6 मे रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार
'भारत माझा देश आहे' सिनेमाचं पोस्टर रिलीजImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 3:50 PM

मुंबई :‘अहिंसा परमो धर्म:’ अशी टॅगलाईन असलेला पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ (Bharat Majha Desh Ahe) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. नावावरूनच हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे, हे कळतेय. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पोस्टरमध्ये राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे बालकलाकार दिसत असून त्यांच्यामध्ये एक बकरीही दिसत आहे. आता ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचा बकरीशी काय संबंध आणि तिची या चित्रपटात काय भूमिका आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. यात या बालकरांसोबत मंगेश देसाई (Mangesh Desai), शशांक शेंडे (Shashank Shende), छाया कदम (Chhaya Kadam) आणि हेमांगी कवीही (Hemangi Kavi) दिसत आहेत. पोस्टरमध्ये टीव्हीवर ब्रेकिंग न्यूजही दिसत आहे. ही ब्रेकिंग न्यूज नेमकी कोणती? याचे उत्तर चित्रपटातच मिळेल.

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, “हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे, मात्र या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. आतापर्यंत क्वचितच असा विषय या पद्धतीच्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला असेल. या चित्रपटात अनेक प्रसंग हसवत हसवत, नकळत खूप गोष्टी सांगून जातात, मनाला स्पर्शून जातात. हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक लहान मुलाने आवर्जून पाहावा, असा हा ‘भारत माझा देश आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय अतिशय दमदार असून प्रत्येकाने आपली व्यक्तरेखा उत्तम साकारली आहे. हा चित्रपट एक सकारात्मक दिशा देणारा आहे.”

‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांची असून निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद लाभले आहेत. .या चित्रपटाला समीर सामंत गीत लाभले असून अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत आहे. निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलक आहेत तर चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

उदय सामंत यांच्या हस्ते ‘श्यामची आई’ सिनेमाच्या शूटिंगचा श्रीगणेशा, पावसमध्ये शुटिंगला सुरूवात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.