परश्यासोबत आधी डेटवर गेली, आता आर्ची म्हणते, “दुनिया है मेरे पिछे लेकीन मैं…!”

अभिनेत्री रिकू राजगुरुने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला. तिचा हा व्हीडिओवर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हीडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.

परश्यासोबत आधी डेटवर गेली, आता आर्ची म्हणते, दुनिया है मेरे पिछे लेकीन मैं...!
रिंकू राजगुरु
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:13 PM

मुंबई : साल होतं 2016 आणि तारिख होती 29 एप्रिल. या दिवशी एक सिनेमा महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. थिएटर्स प्रेक्षकांच्या गर्दीने तुडुंब भरून गेली आणि या सिनेमाचं नाव आहे सैराट (Sairat). सैराटने महाराष्ट्राला दिले दोन सुपरहिट कलाकार. एक म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rrajguru) आणि दुसरा म्हणजे आकाश ठोसर. (Akash Thosar) या दोघांना सैराटने ओळख दिली, त्यांच्यावर महाराष्ट्र भरभरून प्रेम करतो. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एकमेकांना डेट करत असल्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. अश्यातच रिंकूने एक व्हीडिओ शेअर केला आहे. ‘दुनिया है मेरे पिछे लेकिन मै तेरे पिछे…’ या गाण्यावर रील बनवून तिने शेअर केला आहे. या तिच्या व्हीडिओला तिच्या चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. तसंच या व्हीडिओवर कमेंट्सचा पाऊस पडलाय.

रिंकू राजगुरुची इन्स्टाग्राम पोस्ट

रिंकू काहीवेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर गजराही लावलाय. 1967 सालच्या ‘किस्मत’ चित्रपटातील ‘दुनिया है मेरे पिछे लेकिन मै तेरे पिछे…’ या गाण्यावर तिने मोहक हावभाव केलेत. या व्हीडिओला तिने ‘जुनी गाणी माझं प्रेम आहेत’, असं कॅपशन दिलं आहे.

रिंकू-आकाशची अफलातून केमिस्ट्री

रिंकू आणि आकाशची केमिस्ट्री अफलातून आहे. 2016 साली रिंकू आणी आकाशचा सैराट हा पहिलाच सिनेमा. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नवख्या पोरांना घेऊन चित्रपट करण्याचं ठरवलं. आकाश आणि रिंकू सिलेक्शन झालं. चार-सहा महिने दोघेही नागराज मंजुळेंच्या घरी राहिले. त्यादरम्यान दोघांची छान गट्टी जमली. सिनेमाचं शुटिंग सुरु झालं. नागराज अण्णांनी सांगायचं आणि पोरांनी तसं करायचं. नागराज अण्णाच्या कल्पक डोक्यातून सिन निघत होते आणि पोरं अफलातून अभिनय करत होती. रसिक प्रेक्षकांनी सैराट डोक्यावर गेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच सिनेमा ज्याने 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तो आर्ची-परशाचा म्हणजेच रिंकू-आकाशचा ‘सैराट’ सिनेमा.

इतकं सारं यश मिळाल्यावर रिंकू आकाशला वेगवेगळ्या ठिकाणावरुन आमंत्रण मिळू लागले. दोघेही एकसाथ विविध ठिकाणी जाऊ लागले. सिनेमाचे डायलॉग म्हणण्याची वारंवार त्यांना फर्माईश होई. दोघांची केमिस्ट्रीच एवढी अफलातून होती की डायलॉग म्हटल्यावर रसिक प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे. पुढेही आकाश रिंकू मैत्रीचं नात जपलं. अधून मधून भेटत राहिले. संपूर्ण सैराटच्या टीमचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्यावरही सगळ्यांचा संवाद सुरु असतो. सगळे एकमेकांच्या संपर्कात असतात.

संबंधित बातम्या

#AtharvaTheOrigin : धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

Devoleena Bhattacharjee and Vishal Singh Photos : आधी एंगेजमेंटचे फोटो शेअर केले अन् मग देवोलिना म्हणते, “हे तर…”

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.