AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांना मी बाबा म्हणत नाही कारण…; सिद्धार्थ चांदेकरकडून ‘त्या’ भावना व्यक्त

Actor Siddharth Chandekar on Father : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर... सिद्धार्थ वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत परखडपणे मांडत असतो. त्याच्या वैयक्तिक जीवनातील बाबींवरही तो उघडपणे बोलत असतो. आता त्याने त्याच्या वडिलांबाबत स्पष्टपणे त्याचं मत मांडलं. काय म्हणाला? वाचा सविस्तर...

त्यांना मी बाबा म्हणत नाही कारण...; सिद्धार्थ चांदेकरकडून 'त्या' भावना व्यक्त
| Updated on: Mar 19, 2024 | 10:45 PM
Share

मुंबई | 19 मार्च 2024 : कलाकारांचं प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांचं पर्सनल लाईफही चर्चेत असतं. त्यांच्या खासगी आयुष्यातील घटनांबाबत जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या कामासोबतच त्याच्या पर्सनल लाईफमधील घटनांमुळे आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असतो. काही दिवसांआधी सिद्धार्थने त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट शेअर केली. त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत आणि त्याच्या दुसऱ्या वडिलांबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं आहे.

बाबांविषयी सिद्धार्थ म्हणाला…

ज्यांनी मला जन्म दिला ते सध्या कुठे आहेत हे मला नाही माहीत… पण ते माझे बाबा होते. माझ्यासाठी ते एकच बाबा आहेत. माझ्या वडिलांचा आणि माझा काहीचं संपर्क झाला नाही.आजही ते कुठे आहेत ते मला नाही माहीत. पण बाकी कुणाला मी बाबा म्हणू इच्छित नाही. त्यांना मी बाबांची जागा नाही देऊ शकत, असं सिद्धार्थ म्हणाला. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांचं आणि माझं नातंही खूपच छान आहे. त्यामुळे मी त्यांना काय नावाने हाक मारतो. याने तसा काही फरक पडत नाही, असं सिद्धार्थ म्हणाला.

“त्या माझ्या भावना आहेत…”

मिताली मला म्हणते की तू माझ्या वडिलांना बाबा म्हण… पण मी नाही म्हणू शकत. त्या माझ्या भावना आहेत. फक्त हे एकच नातं नाही. तर मी माझ्या आईला सोडून कुणाला आई म्हणत नाही. माझ्या सख्ख्या ताईला सोडून मी कुणाला ताई नाही म्हणत. त्या माझ्या भावना आहेत. ताई माझ्यासाठी एकच आहे. आई माझ्यासाठी एकच आहे. तसं वडीलही माझ्यासाठी एकच आहेत. त्यामुळे मी त्यांना काका म्हणतो,असं सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितलं.

आईच्या लग्नाबाबत सिद्धार्थ म्हणाला…

आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी सिद्धार्थ उघडपणे बोलतो. तो म्हणतो की मी मागची कित्येक वर्षे माझ्या आईला इतकं खुश नव्हतं पाहिलं. पण आता लग्नानंतर ती प्रचंड आनंदी आहे. तिला आनंदी बघून मलाही खूप जास्त आनंद होतो. तिला असंच कायम आनंदी बघायचं आहे, असं सिद्धार्थ म्हणतो.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.