AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांची मोठी घोषणा; 34 वर्षांनंतर…

Mahesrchi Sadi Director Vijay Kondke New Movie Lek Asavi Tr Ashi : 'माहेरची साडी' चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट भेटीला येत आहे. 'लेक असावी तर अशी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

'माहेरची साडी' चित्रपटाच्या दिग्दर्शकांची मोठी घोषणा; 34 वर्षांनंतर...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 28, 2024 | 5:59 PM
Share

मराठी सिनेमांचा इतिहास पाहता यात ठळकपणे उठून दिसणाऱ्या सिनेमांमध्ये माहेरची ‘माहेरची साडी’ या सिनेमाचा वरचा नंबर लागतो. हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला. तेव्हापासून आतापर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमाची गोष्ट तेव्हा गाव खेड्यातील महिलेलाही जवळची वाटली. सिनेमातील गाण्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर या सिनेमाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लेक असावी तर अशी’ हा सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार आहे.

34 वर्षांनंतर…

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी 34 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली विजय कोंडके जाणून आहेत. त्याच धर्तीवर ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.

विजय कोंडके काय म्हणाले?

निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचललं. या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी 26 एप्रिलला घेऊन येतोय, असं विजय कोंडके यांनी म्हटलं.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक