AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मला पांडुरंग ‘असा’ भेटला, अभिनेता स्वप्नील जोशीची पंढरपूर पायीवारी…

Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशीची पंढरपूर पायीवारी...

Video : मला पांडुरंग 'असा' भेटला, अभिनेता स्वप्नील जोशीची पंढरपूर पायीवारी...
| Updated on: Jul 09, 2022 | 4:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र आषाढी एकादशीचा (Ashidhi Ekadashi) माहोल आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला. “वारीचा हा प्रवास” प्रत्येकाने एकदा तरी करावाच..”तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !” असे माझी आजी म्हणायची. ती असे का म्हणायची त्याची अनुभूती मला काल झाली. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही अशा शब्दात स्वप्नीलने आपला अनुभव कथन केला. स्वप्नील म्हणाला की, आम्ही पिक्चरमधील हिरो असलो तरी खरे हिरो हे वारकरीच. वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पायी वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटले.

View this post on Instagram

A post shared by 1 OTT (@1ottofficial)

या वारीमध्ये 1 ओटीटीचे नरेंद्र फिरोदीया सर, विनायक सातपुते ,विनायक श्रीनिवासन सर, आणि आमच्या टीमने जे काम केले आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, लॉस्ट अँड फाऊंड स्टॉल असतील. ते पाहून खूप आनंद झाला. मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा एक वेगळा अनुभव मिळाला आणि आनंद वाटला असेही स्वप्नीलने सांगितले.

1 ओटीटी हा भारत का अपना मोबाईल ओटीटी असून त्याची सुरुवात स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्त्व नरेंद्र फिरोदिया यांनी संयुक्तपणे केली आहे. जानेवारी महिन्यात ह्य१ओटीटीह्णच्या लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.१ओटीटी हा ओटीटी (ओव्हर द टॉप) व्यासपीठ असून त्यावर भारतातील सर्व प्रमुख भाषांमधील कार्यक्रम सादर होणार आहेत. त्याद्वारे तो अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला येत आहे. हा खऱ्या अर्थाने ह्यभारताचा ओटीटी बनणार असून त्यावर हिंदीबरोबर मराठी, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट व मालिका सादर होणार आहेत.

‘1 ओटीटीला ‘ भारत का अपना मोबाईल ओटीटी म्हणून मान्यता असून फिरोदिया व जोशी यांच्याबरोबरच या संस्थेला डीटीएल अ‍ॅक्टीव्हेशन क्षेत्रातील विनायक सातपुते यांच्याबरोबर संस्थापक सदस्य विनायक श्रीनिवासन, राजीव जनी, प्रख्यात बँकर सतीश उतेकर, करमणूक क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्त्व चेतन मणियार यांचेही मोलाचे पाठबळ आहे.

1 ओटीटीने व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) या चित्रपट, संपर्क व सर्जनशील कला प्रशिक्षण संस्थेबरोबर सहकार्य करार केला असून डब्ल्यूडब्ल्यूआयमधील विद्यार्थ्यांनी गेली कित्येकवर्षे तयार केलेले चित्रपट या ओटीटीवर दाखवले जाणार आहेत. ह्यडब्ल्यूडब्ल्यूआयह्णचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष घई आणि ‘1 ओटीटी’चे नरेंद्र फिरोदिया व स्वप्नील जोशी यांनी नुकतीच ही घोषणा केली.

मनोरंजनाबरोबरच सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून पढेगा भारत या उपक्रमाबरोबर सहकार्य करार करत १ओटीटीने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना डीजीटल व्यासपीठावरून त्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध होईल याची तजवीज करून दिली आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.