Video | ‘डोन्ट रश’ म्हणत शालूने दाखवला सोशल मीडियावर जलवा, चाहते म्हणतायत ‘अगयायाया लई खतरनाक डान्स है’!

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video | ‘डोन्ट रश’ म्हणत शालूने दाखवला सोशल मीडियावर जलवा, चाहते म्हणतायत ‘अगयायाया लई खतरनाक डान्स है’!
राजेश्वरी खरात

मुंबई : मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. नुकतेच कोरोना मुक्त झाल्यानंतर ‘शालू’ पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे (Shalu Fame Actor Rajeshwari Kharat Share Don’t Rush trend video on social media).

‘डोन्ट रश’ या इंस्टाग्राम ट्रेंडला फॉलो करत राजेश्वरीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘डोन्ट रश’ या इंग्लिश गाण्यावर राजेश्वरीने ठुमके लगावले आहेत. सोनेरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये राजेश्वरी खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी देखील तिच्या या व्हिडीओ पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

पाहा ‘शालू’चा व्हिडीओ

राजेश्वरीच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये अहमहमिका रंगलेली असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात. त्यामुळे तिच्या फोटोवरील कमेंटमधल्या ‘शेरां’सोबत सव्वाशेरांनी केलेल्या शेअर्सची संख्याही सव्वाशेच्या घरात जाते (Shalu Fame Actor Rajeshwari Kharat Share Don’t Rush trend video on social media).

राजेश्वरीवर मीम्स

“सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते” असे मीम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. आता शालू उर्फ राजेश्वरी खरात, या मीमवर काही रिअॅक्शन देणार का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘फँड्री’नंतर प्रचंड बदलली शालू!

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी, तिने तिच्या नजरेनेच सगळ्यांची मने जिंकली होती. तिच्या चेहऱ्यावरील सहज अभिनय चाहत्यांना भावला होता. चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु, तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र इतक्या काळानंतर ती बदलेल्या अवतारात पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आली आहे.

(Shalu Fame Actor Rajeshwari Kharat Share Don’t Rush trend video on social media)

हेही वाचा :

‘तेंडल्या’ चित्रपटाच्या पडद्यामागची 1 कोटी 70 लाखांची गोष्ट, पुरस्कार मिळाल्यानंतरही कलाकार शेतात का राबतात?

Mukesh Khanna Death Hoax | ‘शक्तीमान’चा कोरोनाने बळी घेतल्याच्या अफवा, अभिनेते मुकेश खन्ना म्हणतात…