AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? पत्नीने सोशल मीडियावरून हटवलं ‘जाधव’ आडनाव

महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थ आणि तृप्ती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत राहत नसल्याचं म्हटलं जातंय. काही कौटुंबिक मतभेदांमुळे हे दोघं वेगळे राहत आहेत.

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? पत्नीने सोशल मीडियावरून हटवलं 'जाधव' आडनाव
सिद्धार्थ जाधव, तृप्ती अक्कलवारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:22 PM

अत्यंत उत्साही आणि इतरांना सतत हसविणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) खासगी आयुष्यात काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती जाधव (Trupti Jadhav) हिने सोशल मीडिया हँडलवरून ‘जाधव’ हे आडनाव काढल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. तृप्तीने आता तिच्या सोशल मीडिया हँडलवर तृप्ती अक्कलवार असं माहेरचं आडनाव लावलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय का, ते घटस्फोट (Divorce) घेत आहेत का, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ हा त्याच्या दोन मुलींसोबत आणि पत्नीसोबत व्हेकेशनवर गेला होता. मात्र दोघांनी एकमेकांसोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. त्यांनी फक्त मुलींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थ आणि तृप्ती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत राहत नसल्याचं म्हटलं जातंय. काही कौटुंबिक मतभेदांमुळे हे दोघं वेगळे राहत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तृप्ती आणि सिद्धार्थ यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं असता गेल्या दोन वर्षांपासून दोघांनी एकमेकांसाठी एकही पोस्ट केलेली नाही. कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्येही दोघं एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या सर्व चर्चांवर आणि आपल्या नात्याबद्दल दोघांनी आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

हे सुद्धा वाचा

सिद्धार्थ जाधवची पोस्ट

तृप्ती अक्कलवारची पोस्ट

तृप्ती कॉलेजमध्ये असताना जर्नलिस्मचा कोर्स करत होती. तेव्हा ती ‘राम भरोसे’ या नाटकाच्या ऑडिशनसाठी गेली होती. तिकडे सिद्धू आणि तृप्तीची ओळख झाली. सिद्धार्थसाठी तर हा ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ असा प्रकार होता. कारण भेटल्यानंतर तीन-चार दिवसांतच तृप्ती हे नाटक करू शकणार नाही असं लक्षात येताच त्याने एलफिन्स्टन स्टेशनवर तृप्तीला प्रपोजसुद्धा करून टाकलं. त्यावेळी तृप्तीला हे पटलं नव्हतं आणि सुरुवातीला तिने सिद्धार्थला नकार दिला होता. त्यानंतर पुढील तीन-चार वर्षांत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर तृप्तीने लग्नाला होकार दिला. 2007 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि तृप्ती यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

सिद्धार्थ जाधव हा मराठीसोबतच बॉलिवूडमधीलही लोकप्रिय अभिनेता आहे. रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. त्याचसोबत काही वर्षांपूर्वी त्याने पत्नी तृप्तीसोबत ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या आणि ‘महाराष्ट्र डान्स सिझन 1’च्या परीक्षकपदी सिद्धार्थ होता.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.