AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhimma | कोरोनाचा मराठी मनोरंजन विश्वालाही मोठा फटका, बहुचर्चित ‘झिम्मा’चे प्रदर्शनही लांबणीवर!

पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने ‘झिम्मा’चे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही मोठी निराशा झाली आहे.

Jhimma | कोरोनाचा मराठी मनोरंजन विश्वालाही मोठा फटका, बहुचर्चित ‘झिम्मा’चे प्रदर्शनही लांबणीवर!
झिम्मा
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 07, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. गेल्यावर्षीपेक्षा अधिक झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनलॉक नियमांतर्गत चित्रपट गृहे सुरु झाली होती. शिवाय नवे चित्रपट मोठ्या आशेने प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने सगळ्यांना परत ‘बंदिस्त’ व्हावं लागणार आहे. याचा मोठा फटका मनोरंजन विश्वालाही बसला आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. यामध्येच आता बहुचर्चित ‘झिम्मा’ (Jhimma) या चित्रपटाचे प्रदर्शन देखील लांबणीवर टाकण्यात आले आहे (Sonalee Kulkarni starrer Jhimma movie release postpone due to corona lockdown).

पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने ‘झिम्मा’चे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही मोठी निराशा झाली आहे. ‘झिम्मा’ चित्रपटातील कलाकारांनी एकत्रित येत या संदर्भात माहिती देणारा एक व्हिडीओ तयार केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

आता वेळ आहे एकमेकांची काळजी घेण्याची!

‘झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला…हा प्रवास थिएटर पर्यंत रंगत जाणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो…आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची…कोरोनासोबत दोन हात करण्याची…सगळं काही सुरळीत झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने, आनंदाचा खेळ म्हणजेच झिम्मा खेळुया! सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया…लवकरच भेटूया, ‘चित्रपटगृहातच!’, असं कॅप्शन सोनालीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे (Sonalee Kulkarni starrer Jhimma movie release postpone due to corona lockdown).

वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाच्या महिला येणार एकत्र!

बायकांच्या मनात काय सुरु आहे, त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते,  तीच आपल्याला ‘झिम्मा’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच कळतंय चित्रपट किती धमाकेदार असणार आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक कथा या चित्रपटात दिसणार आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र, ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे.

(Sonalee Kulkarni starrer Jhimma movie release postpone due to corona lockdown)

हेही वाचा :

Well Done Baby | आधुनिक काळातल्या जोडप्याची गोष्ट, पुष्कर-अमृताच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘हलकी हलकी’ गाणे प्रदर्शित!

VIDEO | हात पकडून अनुष्काने विराटला उचललं, कोहलीच्या तोंडून पटकन निघालं…

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...