Cannes Film Festival 2022: ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘हे’ तीन मराठी चित्रपट होणार सहभागी

कान्स (फ्रान्स) येथे 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो.

Cannes Film Festival 2022: 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' तीन मराठी चित्रपट होणार सहभागी
'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' तीन मराठी चित्रपट होणार सहभागीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 4:18 PM

‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात (Cannes Film Festival) सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी माहिती दिली. कान्स (फ्रान्स) येथे 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे (Marathi Movies) प्रतिनिधी सहभागी होतात.

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या 3 मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई आणि दिलीप ठाकुर या 7 तज्ज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित ‘पोटरा’, नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित ‘कारखानीसांची वारी’ आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित ‘तिचं शहर होणं’ या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.

यंदाच्या कान्स महोत्सवात भारताचा उल्लेख ‘कन्ट्री ऑफ ऑनर’ म्हणून केला जाईल. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ची परंपरा पहिल्यांदाच सुरू होत आहे. भारतापासूनच ही परंपरा सुरू होत असून आगामी काळात इतर विविध देशांना हा मान मिळणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.