Video : तू गेली तर गेली उडत गं, मला नाही फरक पडत गं…व्हॅलेंटनाईनच्या दिवसातही साजन बेंद्रेचं काळीज जाळणारं गाणं ऐकलत का?…

साजन बेंद्रे (Sajan Bendre) हे आता महाराष्ट्राच्या मातीला माहित असलेलं नाव. एकापेक्षा एक ठसकेबाज गाणी साजननं प्रेक्षकांसमोर आणली आहेत.

Video : तू गेली तर गेली उडत गं, मला नाही फरक पडत गं...व्हॅलेंटनाईनच्या दिवसातही साजन बेंद्रेचं काळीज जाळणारं गाणं ऐकलत का?...
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 11:32 AM

मुंबई : साजन बेंद्रे (Sajan Bendre) हे आता महाराष्ट्राच्या मातीला माहित असलेलं नाव. एकापेक्षा एक ठसकेबाज गाणी साजननं प्रेक्षकांसमोर आणली आहेत. हा व्हॅलेनटाईनचा महिना. गुलाबी दिवस. पण साजनचं एक गाण मात्र अजूनही काळीज तुटलेल्यांना आशिकांना आधार देतं. ते गाणं आहे तू गेली तर गेली उडत गं, मला नाही फरत पडत गं! (Tu Geli Tar Udat G Mala Nahi Farak Padat Sajan Bendre’s song goes viral)

साजनचं हे गाणं नेमकं कधीचं आहे?

तू गेली तर गेली उडत गं..हे गाणं साजन बेंद्रेंचं जवळपास दोन वर्षापुर्वीचं आहे. यू ट्युबवर त्याच्या लिंक ह्या 2019 सालातल्या आहेत. काही कार्यक्रमातूनही साजननं हे गाणं गायलेलं दिसतं आहे. ह्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेला ठसकेबाजपणा.

महाराष्ट्राची माती ही ठसकेबाज लावण्यांनी समृद्ध झालेली आहे. त्याच बाजाचं गाणं साजननं केलेलं दिसतं. विशेष म्हणजे ह्या गाण्यात शब्दही जे वापरलेत ते रोजच्या बोलण्यातले आहेत. बोली भाषेतले आहेत. त्यामुळे गाणं थेट भिडतं. ऐकावसं वाटतं.

प्रसंगापेक्षा आयुष्य मोठं सांगणारं गाणं

अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमात तेरा इमोशनल अत्याचार नावाचं एक गाणं आहे. त्याच गाण्याची आठवून करुन देणारं साजन बेंद्रेचं गाणं आहे. प्रेमात सर्वकाही सहन करण्याचीच गाणी आतापर्यंत आली आहेत. पण ब्रेक अप नंतरही किंवा दिल तुटल्यानंतरही आयुष्य शिल्लक आहे आणि ते मजेशीर असतं, एका प्रसंगाला उडवून लावण्याची भाषा ह्या गाण्यांमध्ये आहे. नाईंटी बी लाऊ द्या, मजा बी येऊ द्या, बघा मला पुन्हा झिंगल्यावर हे गाणं दु:खाची बासरी वाजवत नाही बसत तर तू गेली तर गेली उडत गं म्हणून पुढं चालण्याची भाषा करतं.

संबंधित बातम्या : 

Video : आधी मला माझी जानू म्हणायची, बबड्या, पिल्लू, बाळ्या…साजन बेंद्रेचं धूमाकूळ घालणारं ऐकलं का शंकरपाळ्या?

(Tu Geli Tar Udat G Mala Nahi Farak Padat Sajan Bendre’s song goes viral)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.