World Theatre Day : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या मराठीसह भारतीय रंगभूमीचा इतिहास एका क्लिकवर…

World Theatre Day : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या मराठीसह भारतीय रंगभूमीचा इतिहास एका क्लिकवर...
फोटो प्रातिनिधिक

World Theatre Day 2022 : आज जागतिक रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्त हा दिवस का साजरा केला जातो आणि रंगभूमीचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात...

आयेशा सय्यद

|

Mar 27, 2022 | 8:10 AM

मुंबई : आज जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day) आहे. सर्वत्र उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. पण तुम्हाला माहित आहे का की या सगळ्याची सुरूवात कधी झाली? आजपासून बरोबर 61 वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली खरी पण पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. तेव्हापासून हा सिलसिला सुरूच आहे. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू (Joe Cochchu) यांनी पहिल्यांदा हा संदेश देण्याचा पहिला मान मिळवला होता. तर 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांना ही संधी मिळाली होती.

भारतीय रंगभूमी

भारतातील रंगभूमीचा इतिहास खूप जुना मानला जातो.असं मानलं जातं की नाट्यकलेचा पहिला विकास भारतातच झाला. ऋग्वेदातील काही सूत्रांमध्ये यम आणि यमी, पुरुरवा आणि उर्वशी इत्यादींचे काही संवाद आहेत.हे संवाद वाचल्यावर इथूनच नाटकाची सुरुवात झाली असावी, असं अनेक अभ्यासक सांगतात.

मराठी रंगभूमी

नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला.

संबंधित बातम्या

Designer Manish Malhotra : ‘रॅम्प’वर अवतरली मनीष मल्होत्राची ‘झुंड’, ‘लॅक्मे फॅशन विक’मधले खास फोटो…

Vivek Agnihotri यांचा पाय खोलात, “भोपाळी म्हणजे समलैंगिक!” वादग्रस्त विधान भोवलं, तक्रार दाखल

Farhan Akhtar ने आयोजित केली ग्रॅण्ड पार्टी, मिस्टर ॲण्ड मिसेस कौशिक पोहोचले स्टायलिश अंदाजात, पाहा फोटो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें