Marathi Movie : प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री लवकरच… ‘143’ चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

योगेश भोसले दिग्दर्शित प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. (Marathi Movie'143''s Poster Released)

Marathi Movie : प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री लवकरच… '143' चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:40 AM

मुंबई : गेले अनेक दिवसांपासून ‘हे आपलं काळीज हाय‘ (#HeAplaKalijHay) या टॅगलाईननं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी या टॅगलाईनला प्रचंड प्रतिसाद दिला असून त्यांचं काळीज कोण आहे याचा देखील उलगडा कमेंट बॉक्समध्ये केला आहे. ‘हे आपलं काळीज हाय’ ही टॅगलाईन ‘143’ चित्रपटाची असून चित्रपटात कोण कोणाचं काळीज आहे. ‘143’ या प्रेममय भावना व्यक्त करणाऱ्या चित्रपटातून लवकरच उलगडणार आहे. नुकतंच या नवीन चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीनं केलं असून मराठी चित्रपटांमध्ये वेगळेपण दर्शविणारा हा सिनेमा असणार आहे.

योगेश भोसले दिग्दर्शित प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारलं आहे. चित्रपटाचं पोस्टर हे प्रेमबद्ध कथेला बांधून ठेवणारं आहे हे पोस्टर पाहताच लक्षात येते. मात्र पोस्टरवरून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत याचा उलगडा केला नसल्याने चित्रपटात नेमके कोणते कलाकार झळकणार याकडे सिनेरसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दिग्दर्शक योगेश भोसले यांनी आगळ्यावगेळ्या दाक्षिणात्य पद्धतीने चित्रित केलेल्या या चित्रपटात कोणत्या कलाकारांना संधी दिली असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहांनाही पूर्णविराम मिळाला असून रसिक प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकरिता चित्रपटगृहाकडे वळल्या आहेत यातच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन चित्रपटगृह सुरू होताच ‘143..हे आपलं काळीज हाय’ ​हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहता प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर कधी येईल याकडे साऱ्या सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिलं आहे.

संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : ‘चीकू की मम्मी दूर की’च्या प्रोमोमध्ये मिथुन चक्रवर्तीची हटके एन्ट्री, पाहा खास झलक

Neha Dhupia : ‘ए थर्सडे’ चित्रपटात नेहा धुपिया झळकणार गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, आठ महिने प्रेग्नेंट असताना केलं शूटिंग

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरच्या बोल्डनेसचा तडका, किलर लूकने चाहते घायाळ

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.