नेहा धूपियाच्या बहुप्रतीक्षित लुकचं आता अनावरण करण्यात आलं आहे. (Neha Dhupia to play the role of a pregnant police officer in 'A Thursday')
Aug 25, 2021 | 12:53 PM
'ए थर्सडे'मधील एका गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात नेहा धूपियाच्या बहुप्रतीक्षित लुकचं अनावरण करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटादरम्यान नेहा धुपिया आठ महिन्यांची गर्भवती होती.
1 / 5
हजाद खंबाटाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 'ए थर्सडे' हा एका गुरूवारी घडलेल्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.
2 / 5
प्रतिभाशाली अभिनेत्री नेहा धुपिया एसीपी कॅथरीन अल्वारेज नामक गर्भवती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल.
3 / 5
चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे, जी 16 मुलांना बंधक बनवते. या थ्रीलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
4 / 5
'ए थर्सडे'ची निर्मिती आरएसवीपी मूव्हीज आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे करण्यात येत आहे.